Court Canva
गोवा

Goa Crime: मालमत्तेच्या वादात जाळले मावशीचे घर, जीवे मारण्याची धमकी; न्यायालयाकडून संशयिताचा जामीन नामंजूर

Anjuna Crime: संशयिताला जेव्हा जामीन देण्यात आला तेव्हा त्याने त्याचा गैरवापर केला आहे त्यामुळे त्याला जामीन देणे योग होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

Sameer Panditrao

पणजी: हणजूण येथील मालमत्तेच्या वादात ज्येष्ठ नागरिक मावशीचे घर जाळून टाकल्याचा आरोप असलेल्या संशयित करण चोडणकर याचा जामीन अर्ज उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

संशयिताचा पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे, तसेच त्याला जेव्हा जामीन देण्यात आला तेव्हा त्याने त्याचा गैरवापर केला आहे त्यामुळे त्याला जामीन देणे योग होणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

पीडित ज्येष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदाराला तिचा पुतण्या करन चोडणकर हा मालमत्तेवरून त्यांच्यात असलेल्या शत्रुत्वामुळे वारंवार जीवे मारण्याची तसेच घर जाळून टाकण्याची धमकी देत होता. त्यामुळे ती या घरातून इतर ठिकाणी राहण्यास गेली होती.

त्याचा फायदा उठवून संशयिताने तिच्या घराला आग लावली. त्यामुळे तिच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हणजूण पोलिसांनी संशयित करन चोडणकर याच्या जामिनाला विरोध केला होता.

संशयिताची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे, तसेच त्याचा मागील गुन्हेगारी रेकॉर्ड व सुरू असलेल्या खटल्यामुळे तो तक्रारदारासाठी धोका बनला आहे.

त्याच्याविरुद्ध इतर न्यायालयामध्येही खटले सुरू आहेत. त्याला जामीन मिळाल्यास तो ज्येष्ठ नागरिक असलेल्या तक्रारदार तसेच साक्षीदारांना धमकावू शकतो, असा युक्तिवाद पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी केला होता.

संशयिताला पूर्वीच्या कोणत्याही प्रकरणामध्ये दोषी धरण्यात आलेले नाही. त्याच्याविरुद्ध खटले प्रलंबित आहेत, त्यामुळे हे कारण त्याला जामीन नाकारण्यामागे असू नये. पोलिसांनी तपास पूर्ण करून १७ नोव्हेंबर २०२४ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे, तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

सरकरी वकील व संशयिताच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देण्याची शक्यता आहे. जर त्याची सुटका झाली तर या घटनेत गुन्ह्याची शिक्षा जन्मठेपेची नमूद आहे.

आरोपी तक्रारदाराला या प्रकरणात साक्ष देण्याची धमकी देऊ शकतो जेणेकरून खटला थांबेल. मालमत्तेच्या वादामुळे तक्रारदार आणि आरोपीमध्ये देखील शत्रुत्व आहे, असे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना निरीक्षण नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: राष्ट्रीय महामार्ग अनमोड येथे खचल्याने अनमोड घाटावरुन जाण्यास अवजड वाहनांना प्रवेश बंद

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT