Birch nightclub fire Dainik Gomantak
गोवा

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Birch Fire case bail: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यग्र असल्यामुळे हा विलंब झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले

Akshata Chhatre

Ajay Gupta bail plea: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लब आगीच्या प्रकरणातील संशयित आरोपी अजय गुप्ताच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कामामुळे तपासावर परिणाम?

शनिवारी (दि.२०) हणजूण पोलिसांनी या अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाकडे अधिक वेळ मागितला. जिल्हा पंचायत (ZP) निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यग्र असल्यामुळे हा विलंब झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.

मंगळवारी झालेल्या अटकेनंतर आणि मुख्य आरोपी लुथरा बंधूंच्या पोलीस कोठडीनंतर, सह-मालक अजय गुप्ता याने जामिनासाठी म्हापसा न्यायालयात धाव घेतली होती. शनिवारी या अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते.

मात्र, गोव्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणुकीचे वातावरण असून, पोलिसांची मोठी कुमक मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. "निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे जामीन अर्जावर सविस्तर कायदेशीर उत्तर सादर करण्यास वेळ हवा आहे," अशी विनंती तपास अधिकाऱ्यांनी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित केली आहे.

सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

या भीषण दुर्घटनेत २५ निष्पापांचा बळी गेला असल्याने, पोलीस अजय गुप्ताच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे. तो या नाईट क्लबच्या व्यवस्थापनात थेट सहभागी होता, असा प्राथमिक अंदाज आहे.

सोमवारी जेव्हा पोलीस आपले म्हणणे मांडतील, तेव्हा या प्रकरणातील तपासाचे नवीन धागेदोरे समोर येऊ शकतात. तोपर्यंत संशयायित आरोपी अजय गुप्ताला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT