हडफडे अग्नितांडव प्रकरण! 'बर्च बाय रोमिओ लेन'च्या मालकांचे धाबे दणाणले; अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव

Ajay Gupta bail plea: क्लबचा दुसरा सह-मालक अजय गुप्ता याने आता कायदेशीर पळवाट शोधण्यास सुरुवात केली आहे
Birch by Romeo Lane
Birch by Romeo LaneDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवाचे पडसाद अद्याप उमटतच आहेत. २५ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधू सध्या पोलीस कोठडीत असतानाच, या क्लबचा दुसरा सह-मालक अजय गुप्ता याने आता कायदेशीर पळवाट शोधण्यास सुरुवात केली आहे.

जामीन अर्जावर न्यायालयाची नजर

अजय गुप्ताने म्हापसा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय गुप्ताने आपल्या वकिलामार्फत हा जामीन अर्ज सादर केला आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून, पोलीस आणि सरकारी पक्ष या अर्जाला कशा प्रकारे विरोध करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या क्लबच्या मालकी हक्कात गुप्ता याचाही मोठा सहभाग असल्याने, या दुर्घटनेसाठी तो तितकाच जबाबदार असल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या अर्जामुळे आता न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे चिन्हे आहेत.

Birch by Romeo Lane
Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

२५ मृत्यूंचा कलंक आणि मालकांचे उत्तरदायित्व

६ डिसेंबर रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यात पर्यटकांसह क्लबमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणे, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसणे आणि आपत्कालीन मार्ग उपलब्ध नसणे अशा गंभीर त्रुटी या ठिकाणी आढळल्या होत्या.

गौरव आणि सौरभ लुथरा यांच्यानंतर अजय गुप्ता हा देखील या क्लबच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आणि दैनंदिन कामकाजात सहभागी होता. त्यामुळे, एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर त्याला जामीन मिळणे कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

सरकारी पक्षाची भूमिका आणि पुढील पावले

अजय गुप्ताच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष आपले सविस्तर म्हणणे मांडणार आहे. तपास अजूनही प्राथमिक अवस्थेत असून, आरोपी बाहेर राहिल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते किंवा साक्षदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असा मुद्दा पोलिसांकडून मांडला जाण्याची दाट शक्यता आहे.

लुथरा बंधूंनी ज्या प्रकारे देश सोडून पळ काढला होता, तो अनुभव पाहता न्यायालय अजय गुप्ताबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लवकरच होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com