Anjuna Crime News Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime News: मैत्रिणीच्या प्रियकरानेच केला बलात्कार! पीडितेने सांगितला 'तो' भयानक अनुभव

संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

काही कालावधीपासून महिला आणि मुलींवरील अत्याच्याराच्या घटना राज्यात पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये परप्रातीयांचा देखील सहभाग दिसून येतो.

एसडीपीओ जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 19 वर्षांच्या पीडित मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. तिने सांगितले की, ती तिच्या मैत्रिणीसोबत हडफडे येथील एका रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी गेली होती. यावेळी तिच्या मैत्रिणीचा प्रियकरही त्या पिकनिकला आला होता.

पिकनिकला गेलेल्या सर्वांनी पार्टी केल्यानंतर त्या मैत्रिणीच्या प्रियकराने काही वस्तू आणण्याच्या बहाण्याने आपल्या प्रेयसीला बाहेर पाठवले आणि पीडित मुलीच्या बेडरूममध्ये जाऊन पीडितेवर जबरदस्ती करण्याचा त्याने प्रयत्न केला.

पीडिता पळून जाण्यात यशस्वी झाली पण भीतीपोटी तिने वस्तुस्थिती लगेच कुणाला सांगितली नाही. मात्र तीन दिवसांनंतर मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला ही घटना सांगितली आणि तक्रार दाखल केली.

आरोपी व्यक्तीचे नाव अल्बाज उर्फ अफजल नूर अहमद खान असून (वय 21) तो सध्या कामुर्लीमध्ये राहतो तर मूळचा कर्नाटकमधील रहिवासी आहे.

अल्बाज याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर कलम 376 आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT