Anjuna Beach Accident Dainik Gomantak
गोवा

‘बनाना राईड’ ठरली अखेरची! तोल जाऊन महिला पर्यटक पडली पाण्यात, हणजूण समुद्रकिनारी हृदयद्रावक घटना

Anjuna Beach Accident: बनाना फ्लोटर राईड करताना, पाण्यात पडल्यामुळे रजनी सुनील इंदोलिया (३६, रा. मध्य प्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: हणजूण समुद्रकिनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या एका पर्यटक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बनाना फ्लोटर राईड करताना, पाण्यात पडल्यामुळे रजनी सुनील इंदोलिया (३६, रा. मध्य प्रदेश) या महिलेचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी, ११ मार्च रोजी सायंकाळी घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, रजनी आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आल्या होत्या. बुधवारी सायंकाळी त्या कुटुंबासोबत हणजूण समुद्रकिनारी जलक्रीडा प्रकारातील ''बनाना फ्लोटर राईड''चा आनंद घेत होत्या. मात्र, राईड सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या पाण्यात कोसळल्या.

पाण्यात पडताच तिथे उपस्थित असलेल्या जलक्रीडा कर्मचाऱ्यांनी तातडीने रजनी यांना पाण्याबाहेर काढून किनाऱ्यावर आणले. किनाऱ्यावर आणल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवली आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. तातडीने हणजूण येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी, १२ मार्च रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवला असून पुढील तपासासाठी पाठवला आहे.

कार खड्ड्यात कोसळून महिला जखमी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे झुआरीनगर येथे बिट्स पिलानी जवळ एक चारचाकी वाहन खोल खड्ड्यात कोसळून महिला जखमी झाली. या गाडीतील चालक व लहान मुलगी सुखरूप राहिले. वेर्णाच्या दिशेने जाणारी जीए-०६ ई ९५१५ वॅगनआर चारचाकी वाहन बिट्स पिलानी जवळ एका वळणावर पोहोचताच खोल खड्ड्यात कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT