पणजी: राज्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संघटनात्मक बदल करणे आवश्यक असल्याचा अहवाल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना प्राप्त झाला आहे. सचिव प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँग्रेसचे नेते, काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते यांच्याशी चर्चा करून असा अहवाल तयार केला आहे. काँग्रेस स्वबळावर राज्यात चांगली कामगिरी करू शकते असा विचार त्यांनी या अहवालातून मांडला आहे.
यासाठी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या नेत्यांना परत पक्षाचे दरवाजे उघडावेत. याशिवाय प्रदेश पातळीवर गटातटाचे राजकारण बंद करण्यासाठी सर्वमान्य असे नेतृत्व प्रदेश पातळीवर पुढे आणावे असेही त्यांनी सूचवले आहे. आपली संघटनात्मक बाबींवर यापूर्वीच पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचे चोडणकर यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना मान्य केले आहे.
राज्य प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी विरोधातील पक्षांची मोट बांधून लोकसभा निवडणुकीपूर्वी यश मिळवले होते. तीच आघाडी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न असला, तरी डॉ. निंबाळकर यांना संघटनात्मक बांधणी केल्यास काँग्रेस पुन्हा झेप घेऊ शकते असे वाटते. डॉ. निंबाळकर दौरा एकाच दिवसात आटोपून बेळगावला परतल्यानंतर या अहवालाविषयी चर्चा सुरू झाली आहे.
गोव्याच्या राजकारणात काँग्रेस पक्ष पुन्हा सक्षम होण्यासाठी काही महत्त्वाच्या पावलांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वप्रथम पक्षाचे स्थानिक नेतृत्व बळकट करणे आवश्यक आहे.
प्रभावी नेत्यांची नियुक्ती करून त्यांना स्वतंत्र्याने निर्णय घेण्याची मुभा देणे
पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवणे आणि जनतेशी थेट संपर्क साधणे यासारख्या गोष्टींवर भर दिला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.