Anil Dhir  Dainik Gomantak
गोवा

Intrusion : घुसखोरी वेळीच रोखा,अन्‍यथा भारताची स्‍थिती फ्रान्‍ससारखी : अनिल धीर

अनिल धीर : ‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का ? वर संवाद

गोमन्तक डिजिटल टीम

आपल्‍या देशात आज रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचे अवैध पद्धतीने बस्‍तान वसविले जात आहे. त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला जातोय. या घुसखोरांबाबत केंद्र सरकारने कडक पावले न उचलल्यास भारताची स्‍थिती फ्रान्ससारखी होईल, असा इशारा ओडिशा-भुवनेश्वर येथील इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे संयोजक तथा अभ्यासक अनिल धीर यांनी दिला. हिंदू जनजागृती समितीतर्फे ‘फ्रान्सची आग भारतापर्यंत येईल का?’ या विषयावरील ऑनलाईन संवादात ते बोलत होते. काणकोण येथे अनेकांनी त्‍यात सहभाग घेतला.

एक सेक्युलर देश म्हणून युरोपमध्ये फ्रान्सचे उदाहरण दिले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्सने आपल्या सीमा शरणार्थींसाठी खुल्या केल्या. आता फ्रान्समध्ये ज्या दंगली होत आहेत, त्या अचानक होत नसून गेली ३० ते ४० वर्षांपासूनची ही तयारी आहे. फ्रान्समध्ये लादलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील लोक भोगत आहेत. युरोपमधील अन्य देश आता सतर्क झाले असून फ्रान्समध्ये जे घडले ते कुठेही घडू शकते याची त्‍यांना कल्‍पना आलेली आहे, असे धीर म्‍हणाले.

पोलंड आणि जपान या देशांनी प्रारंभीपासूनच अवैध घुसखोरी होऊ दिली नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसुद्धा याच धर्तीवर प्रयत्नरत आहेत. हिंसाचारानंतर आता फ्रान्समध्ये कठोर कायदे लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्थितीवरून भारताने धडा घेऊन अवैध घुसखोरी आणि वास्तव्याविषयी देशात कठोर कायदे लागू करायला हवेत, असेही धीर यांनी स्‍पष्‍ट केले.

फ्रान्समधील एकंदरीत स्थिती पाहता भारताने खूप सतर्क रहायला हवे, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी शेवटी सांगितले.

शरणार्थीं म्‍हणून आले, राज्‍यकर्ते झाले

सध्या फ्रान्समध्ये दंगली घडवून आणल्या जात आहेत. पूर्वीपासूनच तो अल्पसंख्यांकांचा ‘ग्लोबल पॅटर्न’ राहिला आहे. प्रथम शरणार्थी म्हणून जायचे, नंतर तेथील संस्कृती, वारसा, ऐतिहासिक वास्तू नष्ट करून स्‍थानिकांनाच शरणार्थी बनवायचे आणि तिथे ‘दार-उल-इस्लाम’चे राज्य आणायचे. काही वर्षापूर्वी भारतामध्येही अवैध पद्धतीने आलेले रोहिंग्या मुसलमान यांचाही असाच धोका आहे.

आज भारतात अनेक ठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाले आहे. देशविरोधी कारवाया वाढत चाललेल्‍या आहेत. एकूणच भारतविरोधी शक्तीचा बिमोड करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन शासनाला साहाय्य करावे लागेल, असे विश्‍‍व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्‍सल म्हणाले.

शरणार्थींचा वापर

फ्रान्समध्ये झालेल्या दंगली पूर्वनियोजित होत्या. फ्रान्स आणि विविध देशांतील राजकीय नेते शरणार्थीं मुसलमानांचा दंगली आणि हिंसाचार करण्यासाठी वापर करत आहेत. या शरणार्थी मुसलमानांनी घडवून आणलेल्या दंगलीचे समर्थन करण्याची मुळीच गरज नाही.

मारिया वर्थ, जर्मनीच्‍या प्रसिद्ध लेखिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT