Workers Protest In Panjim, Goa Dainik Gomantak
गोवा

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Bharat Bandh 09 July 2025: राज्य सरकारने कदंब आणि फेरी मार्गचे खासगीकरण करु नये, अशी मागणी राजू मंगेशकर यांनी केली.

Pramod Yadav

पणजी: राज्यात कामगारांची जी पिळवणूक चालली आहे. कामगार विरोधी कायदे आणले जात आहेत, ते पाहता कामगारांना 'भिवपाची गरज आसा', असे प्रतिपादन ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले.

आझाद मैदान येथे कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या मोर्चाला संबोधित करताना फोन्सेका बोलत होते. यावेळी सुहास नाईक, राजू मंगेशकर, प्रसन्न उट्टगी, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुरगावकर, नेहा दिवकर तसेच हजारोंच्या संख्येने कामगारवर्ग उपस्थित होता.

यावेळी फोन्सेका म्हणाले, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन देण्यात येते; परंतु त्यांना कामात कायमस्वरूपी रुजू करून घेणे गरजेचे आहे. त्यांना ग्रॅच्युएटी, पेन्शन तसेच इतर सुविधादेखील मिळणे गरजेचे आहे. त्यांना हा लाभ मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.

फोन्सेका यांनी काय मागण्या केल्या

१)   कामगाराच्या हिताचे नसणारे केंद्र सरकारचे चार कामगार कायदे रद्द करावेत.

२)   कामगारांच्या अधिकारांवर गदा आणणारा एस्मा कायदा रद्द करणे आवश्यक

३)   पंचायत, गोवा डेअरी, पूर्व प्राथमिक मदतनीस, pwd कामगार पुरवठा सोसायटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा

४)   शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करावी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

Morjim: हॉटेलचे सांडपाणी सोडले समुद्रात! मोरजी येथील किळसवाणा प्रकार; प्लास्टिक पिशव्यांमधून टाकला कचरा

Rashi Bhavishya 10 August 2025: आर्थिक फायदा, आर्थिक स्थितीत सुधारणा मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT