Anganwadi workers Dainik gomantak
गोवा

सरकार विरोधात अंगणवाडी कर्मचारी प्रलंबित मागण्यांवरुन आक्रमक

21 डिसेंबरला पणजीत आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा

दैनिक गोमन्तक

अंगणवाडी कर्मचारी (Anganwadi workers) तसेच मदतनिसांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सरकारकडून कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने हे कर्मचारी (workers) आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी महिला व बाल कल्याण खात्याला निवेदन सादर केले. या निवेदनातील मागण्यांवर येत्या 14 दिवसांत खात्याने निर्णय न घेतल्यास 21 डिसेंबरला पणजीत आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (Anganwadi workers aggressive against the government over pending demands Azad Maidan)

गोवा (Goa) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांचे 11 मागण्यांचे निवेद आज दिले. या मागण्या पूर्ण न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी संघटना आंदोलन उभारील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या अंगणवाडी कर्मचारी व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सवलती लागू करण्यात याव्यात. त्यांच्या मानधनात वाढ केली जावी. 10 वर्षांपर्यंत सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के, तर 11 वर्षे व त्यावरील सेवा बजावलेल्यांना 50 टक्के वाढ दिली जावी. 10 वर्षे सेवा केलेल्यांना दरवर्षी इन्क्रिमेंट दिली जावी. कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपये, तर मदतनिसांना 500 रुपये ही इन्क्रिमेंट असावी. ज्येष्ठेतेनुसार ही इन्क्रिमेंट दिली जावी. 10 ते 20 वर्षे सेवा केलेल्यांना एक इन्क्रिमेंट, तर 21 वर्षांवरील सेवा केलेल्यांना दोन इन्क्रिमेंट देण्यात याव्यात.

कर्मचारी व मदतनिसांना निवृत्तीवेतन (Pension) योजना लागू करावी. निवृत्तीनंतर कर्मचारी व मदतनिसांना अनुक्रमे 3 लाख व 1.5 लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते ते वाढवून अनुक्रमे 6 लाख व 3 लाख करण्यात यावे. या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला निवृत्तीवेतनाचे आर्थिक साहाय्य देण्यात यावे. कर्मचाऱ्यांची सेवा खंडित न करता ते सुरूच ठेवली जावी. समान कामासाठी समान वेतन हे धोरण अवलंबण्यात यावे. आजाराची सुट्टी लागू करावी तसेच शैक्षणिकदृष्ट्या पात्र असलेल्या व प्रशिक्षित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत सामावून घेतले जावे या मागण्यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: टीम इंडियाला धक्का, दिल्ली कसोटीत जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स, 'या' खेळाडूला संधी मिळू शकते

Goa Live News: गोव्यात बरसणार मुसळधार सरी, हवामान विभागाकडून इशारा जारी

Dengue Shock Syndrome: काय आहे डेंग्यू शॉक सिंड्रोम? कसा बनतो मृत्यूचं कारण? दुर्लक्ष करणं पडू शकत महागात; जाणून घ्या लक्षणे आणि बचावात्मक उपाय

Goa Drug Bust: शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

BJP Workers Fight: चहा-नाश्त्यावरून वाद, भाजप कार्यालयातच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी Watch Video

SCROLL FOR NEXT