Anganwadas in canacona  Dainik Gomantak
गोवा

काणकोण तालुक्यातील अंगणवाड्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

अंगणवाड्यांना भाड्याच्या खोलीचा आधार

दैनिक गोमन्तक

काणकोण: मुले ही देवाघरची फुले’ असे म्हणतात. या लहान मुलांनाच जर योग्यवेळी सोयी-सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेला महत्त्व दिले जाणार नसेल तर उत्तम संस्कार कसे होणार ? कारण काणकोण तालुक्यात अनेक ठिकाणच्या अंगणवाड्यांना आजही भाड्याच्याच खोलीचा आधार घ्यावा लागत आहे. ‘कॅच देम यंग’, असे म्हटले जाते. लहान वयातच मुलांना योग्य वातावरणात योग्य वळण देण्याची गरज शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र, राज्यात या वयात ‘खेळा व शिका’ या तत्त्वाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. ( Anganwadas in canacona taluka in deplorable condition; Many Anganwadis in rented rooms )

काणकोणात 83 अंगणवाड्यांपैकी 55 अंगणवाड्या आजही खासगी भाडोत्री खोल्यांमध्ये सुरू आहेत. त्यापैकी फक्त बारा सरकारी मालकीच्या इमारतीत चालतात. सात समाजगृहात सुरू आहेत. तर नऊ अंगणवाड्यांनी सरकारी प्राथमिक शाळांच्या इमारतीत आसरा घेतला आहे. या 83 अंगणवाड्या मधून 926 मुले असून या अंगणवाड्यामधून 83 अंगणवाडी सेविका व 80 सहाय्यिका काम करीत आहेत. बाल महिला विकास कल्याण खात्यातर्फे या अंगणवाड्या चालविण्यात येतात.

छपर खाली आले; घराचा भाग कोसळला

हल्लीच गवळ-खोला येथील खासजगी जागेत चालणाऱ्या अंगणवाडीच्या घराचा एक भाग कोसळला. यामुळे ही अंगणवाडी सध्या एका खासगी घरात स्थलांतरित करण्यात आली आहे. घराच्या एका भागाचे छपर खाली आल्यानंतर ही अंगणवाडी येथील क्लबहाऊसमध्ये स्थलांतर करण्यासाठी केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, शेवटी अंगणवाडी खासगी जागेत स्थलांतरित करावी लागली आहे.

सांगा, दोष कुणाचा

सध्या पावसाळी विधानसभा अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शैक्षणिक दर्जाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगितले आहे. शिक्षणाला फारसे महत्त्व देणारे मुख्यमंत्री सावंत हे जर शैक्षणिक दर्जा न खालावण्यासाठी खटाटोप करणार असतील, तर अंगणवाड्यांना ‘सुगी’चे दिवस कधी आणणार ? असा प्रश्न सर्वसाधारण पालकांतून विचारला जात आहे. अंगणवाडीतून चिमुकल्यांवर संस्कार केले जातात. त्यांना फुलवणे, वाढवण्याचे काम अंगणवाडी करते. तरीही आजही अंगणवाड्यांना भाड्याच्या खोलीचा आधार घ्यावा लागणे हा दोष कुणाचा, हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

अंगणवाड्यांची सद्यःस्थिती

एकूण अंगणवाड्या - 83

खासगी घरात चालतात - 55

सरकारी इमारतीत चालतात - 12

समाजगृहात चालतात - 7

सरकारी शाळांमध्ये चालतात - 9

अंगणवाडी सेविका - 83

अगणवाडी सहाय्यिका - 80

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT