माझ्या राजकीय कारकिर्दीवर वाईट परिणाम झाला - डॉमनिक गावकर

येत्या आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
AAP
AAP Dainik Gomantak

मडगाव: आपचे स्थानिक नेते आणि राय जिल्हा पंचायत सदस्य डॉमनिक गावकर हे आप पक्षाला राम राम करून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून येत्या आठवड्यात ते भाजपात प्रवेश करतील असे सांगितले जाते.

(AAP leader Dominic Gavkar is on the path of BJP)

AAP
गोव्यातील बंडखोरी काँग्रेसने दडपली, मात्र भाजप आणि बंडखोरांमधील संपर्क कायम

यासंदर्भात गावकर याना विचारले असता त्यांनी या वृताला दुजोरा दिला. माझी भाजपच्या नेत्यांशी बोलणी झाली असून मी लवकरच त्या पक्षात प्रवेश करणार असे त्यांनी सांगितले.

2022 मध्ये गावकर यांनी आपच्या उमेदवारीवर कुडतरी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. आप पक्ष का सोडता असे विचारले असता, मी निवडणुकीला उभा राहिल्यावर आपने मला काही आश्वासने दिली होती. पण ती नंतर पाळली गेली नाहीत.

आप तर्फे निवडणूक लढविणे ही माझी चूक होती. माझ्या राजकीय कारकिर्दीवर या निर्णयामुळे बराच वाईट परिणाम झाला असे ते म्हणाले.

या संबंधी आपचे गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पालेकर याना विचारले असता गावकर यांनी आपवर केलेले आरोप चुकीचे आहेत. गावकर यांच्यावर भाजपकडून दबाव येत होता. ते त्यांच्या व्यवसायास मारक होत होते. त्यासाठीच ते भाजपात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस व इतर यंत्रणांचा वापर करून बिगर भाजप नेत्यांना धमकवण्याचा दुर्दैवी प्रकार सध्या गोव्यात भाजपकडून होत आहे असा आरोपही पालेकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com