विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय गाठावे - प्रेमेंद्र शेट

चोडण येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Premendra Shet
Premendra ShetDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. केंद्रीत केलेल्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करतात, तेच विद्यार्थी यशाचे शिखर गाठतात, असे मत फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष तथा मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी चोडण येथे बोलताना व्यक्त केले. ( Students must first set their goals - Mayem MLA Premendra Shet )

Premendra Shet
Goa Rain Updates : 14 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

चोडण शैक्षणिक संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यात शेट प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चोडण-माडेल शाखेतर्फे हा गौरव सोहळा पुरस्कृत करण्यात आला होता.

यावेळी चोडण शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रेमानंद महांबरे, स्टेट बँक ऑफ इंडिया चोडण-माडेल शाखेच्या व्यवस्थापिका सपना गजेंद्रगड, चोडण शैक्षणिक संस्थेचे सरचिटणीस दिलीप फोंडेकर, साळकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक शंकर चोडणकर, विद्यालयाचे प्राचार्य संदीप सावळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Premendra Shet
माझ्या राजकीय कारकिर्दीवर वाईट परिणाम झाला - डॉमनिक गावकर

सपना गजेंद्रगड यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. शंकर चोडणकर, प्रेमानंद महांबरे आणि दिलीप फोंडेकर यांचेही भाषण झाले. मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

साळकर विद्यालयात ९३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवलेल्या प्रार्थी कांदोळकर आपल्या शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना आणि आपल्या पालकांना दिले. प्राचार्य संदीप सावळ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. लुईजा लुइस यांनी केले. तर संतोष मळीक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com