Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: ...आणि म्हणूनच स्थानिक पक्षीय नेते होते कर्नाटक मतदारांच्या संपर्कात

मतदानासाठी सर्वांचेच शर्थीचे प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

Amit Patkar कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी हजारो मतदार गोव्यातून गेल्या दोन दिवसांपासून कर्नाटककडे रवाना होत आहेत. आजही कदंब बसस्थानकावर कर्नाटकात जाणाऱ्या लोकांची गर्दी होती.

परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातून या मतदारांशी संपर्क साधला गेलाच, शिवाय येथील त्या-त्या पक्षाचे कार्यकर्तेही कर्नाटकात मतदान असणाऱ्यांच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यात कर्नाटकातील लोक लाखोंच्या संख्येने आहेत, तर मतदार हजारोंच्या संख्येने आहेत. काहींनी आपले मतदान गोव्यातच नोंदवून घेतले आहे, तर काहींनी आपले मतदान कर्नाटकात ठेवले आहे.

कर्नाटकच्या मतदार यादीत नाव असलेल्यांशी संबंधित मतदारसंघांतील उमेदवारांचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी संपर्क साधतात. अशा मतदारांचा येण्या-जाण्याचा खर्च संबंधित उमेदवार उचलत असतात. त्यामुळे ही मते पक्की मानली जातात.

त्यामुळेच राज्यातून हजारोंच्या संख्येने कर्नाटकात मतदान करण्यासाठी जाणाऱ्यांचे मत निर्णायकी ठरणारे असते. त्यातूनच गोव्यात राहणाऱ्या कर्नाटकातील मतदारांशी तेथील नेतेच सोडा, पण गोव्यातीलही नेते संपर्क साधून होते.

काँग्रेस आणि भाजपनेही आपापली यंत्रणा या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी राबविली होती. कर्नाटकातील लोक राज्यभर विस्तारलेले आहेत.

कर्नाटकात मतदानासाठी जाण्याकरिता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, तसेच कर्नाटक राज्य व इतर महामंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटांची सोय करणारी यंत्रणा राबविली गेल्याची माहिती एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिली.

आम्ही कर्नाटकातील मतदारांच्या संपर्कात होतो, आजही अनेक मतदार रवाना होत आहेत. काँग्रेससाठी राज्यात चांगले वातावरण आहे आणि सर्व उमेदवारांना जिंकण्याचा विश्‍वास वाटत आहे.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT