Goa Assembly Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session 2023: गोव्याशी संबंधित प्राचीन, ऐतिहासिक दस्तऐवजांना मिळणार संरक्षण

राज्य सरकार सादर करणार विधेयक

Akshay Nirmale

Goa Assembly Session 2023: गोव्याशी संबंधित प्राचीन, ऐतिहासिक दस्तऐवजाच्या संरक्षणासाठी राज्य सरकार विधेयक आणणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी गोवा विधानसभेच्या चालू पावसाळी अधिवेशनात गोवा प्राचीन आणि ऐतिहासिक नोंदी, संपादन आणि जतन विधेयक, 2023 सादर करण्याचा निर्णय घेतला.

या विधेयकानुसार जर असे दस्तऐवज नष्ट करण्याचा, विद्रुप करण्याचा प्रयत्न झाल्यास तुरूंगवास आणि दंडाची तरतूदही करण्यात येणार आहे.

गोव्याशी संबंधित जुन्या हस्तलिखिते आणि ऐतिहासिक नोंदींचे रक्षण करण्याच्या उद्देशाने या कायद्यात प्राचीन आणि ऐतिहासिक नोंदी राज्य सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय राज्याबाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

परंतु जर असे काही दस्तऐवज कार्यालयीन कामकाजासाठी नेले जाणार असतील किंवा कोणत्याही अधिकृत कारणासाठी राज्याबाहेर नेले जाणार असेल तर अशी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नसेल.

या कायद्यांतर्गत कार्ये पार पाडण्यासाठी सरकार गोवा गॅझेटियर आणि ऐतिहासिक नोंदी विभागासाठी अभिलेखशास्त्रज्ञ नियुक्त करू शकते, असे विधेयकात म्हटले आहे.

हस्तलिखितांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी आणि पुरातन आणि ऐतिहासिक नोंदींची योग्य व्यवस्था, देखभाल आणि जतन करण्यासाठी अभिलेखशास्त्रज्ञ जबाबदार असेल

त्याच्या ताब्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक नोंदी अधिकृततेशिवाय काढून टाकल्या गेल्या, नष्ट केल्या, विद्रुप केल्या किंवा बदलल्या गेल्यास, या विधेयकानुसार अशा प्राचीन आणि ऐतिहासिक नोंदींच्या पुनर्प्राप्तीसाठी किंवा पुनर्संचयित करण्यासाठी ताबडतोब योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार पुराभिलेखगाराला असेल.

या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

Goa Bus Stand: गुड न्यूज! गोव्यातील 'ही' बसस्थानके होणार चकाचक; जवळपास 400 कोटी खर्चून मिळणार अद्ययावत सुविधा

Serendipity Festival 2025: सेरेंडिपीटीत अवतरणार महाकाय नरकासुर! 5 वेगवेगळ्या ठिकाणी मिळणार पाहायला; संपूर्ण माहिती जाणून घ्या..

एकाच घरातील तिघी बहिणी, भाऊ आणि बॅचलर पार्टीसाठी आलेला 'इशाक'; हडफडे क्लब आगीमुळे एका क्षणात अनेक कुटुंबांवर शोककळा

SCROLL FOR NEXT