Anita Kholkar Dainik Gomantak
गोवा

Navratri 2022 : सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिता खोलकर यांचा लक्षवेधी प्रवास

मूळ मडगावच्याच असलेल्या अनिता यांना लहानपणापासून पोलिस पेशाचे, खाकी वर्दीचे आकर्षण होते. दहावीनंतर त्या पोलिस कॉंस्टेबल म्हणून भरती झाल्या त्या 1981 मध्ये.

गोमन्तक डिजिटल टीम

Navratri 2022 : खाकी वर्दी म्हटली, की अनेकांची बोबडी वळत असते, वास्तविक गुन्हेगारांसाठी ती भीतीदायक असावी, जो निरपराध आहे, त्याने या वर्दीला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे खुद्द पोलिस अधिकारीच सांगतात. अशाच एक पोलिस अधिकारी म्हणजे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिता खोलकर. खाकी वर्दीचा उपयोग गुन्हेगारांमध्ये जरब बसविण्याबरोबरच कायदाप्रेमींना मदत करण्यासाठी व्हायला हवा, या मताच्या त्या आहेत.

मूळ मडगावच्याच असलेल्या अनिता यांना लहानपणापासून पोलिस पेशाचे, खाकी वर्दीचे आकर्षण होते. दहावी नंतर त्या पोलिस कॉंस्टेबल म्हणून भरती झाल्या त्या 1981 मध्ये. त्यांचे शालेय शिक्षण मडगावच्या दामोदर विद्यालयात झाले. त्या काळात महिला पोलिस खात्यात रुजू होण्याचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे त्यांना घरातून तसेच मित्रमंडळींकडून विरोध झाला, पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या.

सुरुवातीच्या प्रशिक्षणानंतर मडगाव, राखीव पोलिस दल, काणकोण, कुडचडे, कोलवा अशा अनेक पोलिस ठाण्यावर त्यांनी काम केले. नंतर 2006 मध्ये त्यांना हेड काँस्टेबल म्हणून तर 2021 मध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली. तेव्हापासून त्या फातोर्डा पोलिस स्टेशनवरच आहेत. गेली 41 वर्षे त्या पोलिस खात्यात असून या काळात त्यांच्यावर कोणताही ठपका नाही. उलट मनमिळाऊ व सगळ्याशी आपुलकीने, मिळून मिसळून वागणाऱ्या म्हणून त्या ओळखल्या जातात. वरिष्ठांनी सोपविलेले काम चोखपणे बजावणे, ही त्यांची खासियत आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलाविषयक काही प्रकरणे असतील, तर ती त्या आपुलकीने हाताळतात. त्यामुळे एक विश्वासाचे नाते तयार होते, अशी त्यांची धारणा आहे.

विशेष कार्यपद्धत

पोलिस खात्‍यात काम करताना जरब हा लागतोच. त्‍याचसोबत एखाद्या प्रकरणाचा तपास करताना जोर जबरदस्ती ऐवजी विश्वासाने त्यांच्या मनातील काढून घेणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे एखादी व्यक्ती जेव्हा एखादी तक्रार घेऊन येते तेव्हा त्याचे समाधान होईल अशी चौकशी करणे, ही त्‍यांची कार्यपद्धत आहे.

41 वर्षे सेवा

पोलिस सेवेत काम करताना त्यांना घरातून चांगले सहकार्य मिळाले; पण ही ड्युटी करताना त्यांनी मुलांकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांना भरपूर वेळ दिला. 41 वर्षांच्या सेवेत त्‍यांचे वेळोवेळी भरपूर कोडकौतुक झाले. जेसी, रोटरीसारख्या सेवाभावी संस्थांकडून त्‍यांचा अनेकदा सत्कार झाला. अशा या अनिताबाई पोलिस स्टेशनवरच आपणाला खरे समाधान मिळते, असे सांगतात तेव्हा कुणीही त्यांना सलामच करणार!

प्रमोद प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT