Dattaram Pednekar Dainik Gomantak
गोवा

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कॉंग्रेसचा महत्त्वाचा वाटा: दत्ताराम पेडणेकर

भाजपकडून (BJP) हेतुपुरस्सर देशाचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न चालला आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाबरोबरच त्याच्या जडणघडणीत कॉग्रेस (Congress) पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. भाजपकडून (BJP) हेतुपुरस्सर देशाचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न चालला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) राज्यातील जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली होती परंतु फसवेगीरीने त्यांनी सत्ता स्थापन केली.

मात्र यापुढील सरकार हे कॉग्रेसचेच बनणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर यांनी बादें -आंसगांव येथे केले. शिवोली कॉग्रेस गट समितीकडून बादें येथे आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात पेडणेकर बोलत होते. कॉग्रेस सेवा दलाच्या समितीवर दताराम पेडणेकर यांची प्रभारी बाबी बागकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

व्यासपीठावर  प्रभारी बाबी बागकर, गटाध्यक्ष राजन घाटे, शिवोली महिला अध्यक्षा पार्वती नागवेंकर, युथ कॉग्रेसचे रोशन चोडणकर, जिल्हा कार्यकारिणीचे यश कोचरेकर, प्रिया राठोड तसेच  जैवविविधता विभागाचे मायकल डिसौझा आदी मान्यवर उपस्थित होते. शिवलीत व्यक्ती बदलून पाहिली मात्र विकासाचे नांव दिसत नाही आता कॉगेसशिवाय तरणोपाय नसल्याचे सांगितले. सुत्रसंचालन राजेश.कोचरेकर यांनी तर आभार प्रदर्शन मायकल डिसौझा यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

Goa Opposition Alliance: जनतेचे ऐका, महाआघाडी करा! दसऱ्यापर्यंत निर्णय घेण्याची सरदेसाईंची काँग्रेसकडे मागणी

खरी कुजबुज: बाबू पुन्हा आक्रमक...

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

SCROLL FOR NEXT