वास्को येथील तात्पुरती मासळी मार्केट मध्ये उभारलेले बेकायदेशीर दुकान. Dainik Gomantak
गोवा

Vasco Illegal Hotel: धक्कादायक! वास्को येथील देव दामोदर ट्रस्टच्या जागेत परप्रांतीयने थाटले बेकायदेशीर हॉटेल

देव दामोदर ट्रस्टच्या जागेचा ताबा महसुल विभागाकडे आहे. या जागेत मुरगाव नगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार, राज्य महसुल विभागाने पालिकेला तात्पुरती मासळी मार्केट उभारण्यासाठी जागा भाडेपट्टीवर दिलेली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को देव दामोदर ट्रस्टच्या जागेचा कायदेशीर ताबा राज्य महसुल विभागाकडे आहे. सद्या तात्पूरर्ती मासळी मार्केटसाठी मुरगाव नगरपालिकेला भाडेपट्टीवर महसुल विभागाने दिली आहे. मात्र मुरगाव नगरपालिकेच्या काही भ्रष्ट नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने एका परप्रांतीय व्यक्तीने बेकायदेशीर प्लास्टिकचे दुकान उभारून हॉटेल करण्याचा कट रचला असल्याची तक्रार बिगर सरकारी संस्था 'गोवा फस्टचे' अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी राज्य सरकारच्या विविध विभागात केली आहे.

(An illegal hotel was constructed in the premises of Dev Damodar Trust in Vasco )

वास्को शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली देव दामोदर ट्रस्टच्या जागेचा ताबा महसुल विभागाकडे आहे.या जागेत मुरगाव नगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार, राज्य महसुल विभागाने पालिकेला तात्पुरती मासळी मार्केट उभारण्यासाठी जागा भाडेपट्टीवर दिलेली आहे.

त्यानुसार पालिकेने तेथे फक्त तात्पुरती मासळी मार्केट उभारण्याची परवानगी तेवढीच दिलेली आहे. परंतु मुरगाव नगरपालिकेच्या काही भ्रष्ट नगरसेवका बरोबर अधिकार्‍यांनी तात्पुरती मासळी मार्केट मध्ये प्लास्टिकचे दुकान उभारण्यात दिले आहे.

सदर दुकान देव दामोदर ट्रस्टच्या जागेत बेकायदेशीर असून, याविरोधात गोवा फर्स्टचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी मुरगाव तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, मामलेदार व राज्य पालिका संचालक, मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.

राज्य महसुल विभागाने देव दामोदर ट्रस्ट जागेचा उपयोग फक्त मुरगाव नगरपालिकेला तात्पुरती मासळी मार्केटसाठी दिलेली आहे. यासाठी त्या जागेत मासळी व्यवसाय तेवढाच होणे आवश्यक आहे.मात्र मुरगाव पालिकेच्या काही भ्रष्ट नगरसेवक व अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे देव दामोदर ट्रस्टच्या जागेत एका परप्रांतीयाला दुकान थाटण्यासाठी परवानगी दिली आहे.

मुरगाव पालिकेने भ्रष्टाचार करण्याचे सुरुच ठेवले आहे. यापूर्वी 2006 मध्ये पालिकेच्या मार्केट मधील शौचालयाचे रूपान्तर चक्क गौमास दुकानात करून भ्रष्ट्राचार केलेला आहे. याविरोधात परशुराम सोनुर्लेकर यांनी पंतप्रधान कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.

यामुळे मुरगाव पालिकेचा भ्रष्ट्राचार जगजाहीर झाला होता. आता चक्क एका परप्रांतीयाला मासळी मार्केट मध्ये हॉटेल थाटण्यासाठी बेकायदेशीर जागा उपलब्ध करून पालिकेने भ्रष्ट्राचार करण्यास अग्रेसर ठरले आहे. या बेकायदेशीर दुकाना विरोधात गोवा फर्स्टचे अध्यक्ष सोनुर्लेकर यांनी तक्रार संबंधितांकडे केली आहे. तसेच तक्रारीत बेकायदेशीर दुकानावर कारवाई करण्याची मागणी सोनुर्लेकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: मुंगुल हल्ला प्रकरण, आणखी 3 आरोपींना अटक

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

SCROLL FOR NEXT