Margo Dainik Gomantak
गोवा

Margo Corporation : मडगाव पालिकेच्या फाईल्स आमदाराचा कर्मचारी नेतो घरी; कुतिन्हो यांचा आरोप

Margo Corporation : मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margo Corporation :

सासष्टी, सध्या मोती डोंगर झोपडपट्टीतील बेकायदा घरांना क्रमांक देण्याचे प्रकरण गाजत असतानाच शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी आणखी काही भानगड चव्हाट्यावर आणली आहे.

कुतिन्हो म्हणाले की, मडगाव पालिकेत सध्या आमदाराचा कर्मचारी पिशवीमध्ये फाईल्स भरून आणतो आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन त्या परत नेतो.

सरकारने नवा कायदा करावा आणि सर्वांनाच कामाच्या फाईल्स पालिकेतून घरी नेण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे पालिकेतून फाईल्स गहाळ होण्याचे प्रकार थांबतील, असा उपरोधिक टोला सावियो कुतिन्हो यांनी मारला.

या पत्रकार परिषदेस ॲड. स्नेहल ओंसकर, आर्किटेक्ट कार्लुस ग्रासियस, लालन पार्सेकर, मारिया दो कार्मो, कामिल कामेरा, सुजाता पार्सेकर आणि इतर उपस्थित होते.

कुतिन्हो म्हणाले की, कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्याने मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे मताधिक्य कमी झाल्याने ते भयभीत झाले आहेत. त्यामुळेच ते बेकायदेशीर घरांना क्रमांक देण्यास पुढे सरसावले आहेत. जर बेकायदेशीर घरांना क्रमांक द्यायचा असेल तर मग एकाच परिसरातून शेकडो अर्ज कसे? संपूर्ण मडगाव शहरामधून हे अर्ज यायला पाहिजे होते, असा प्रश्‍न कुतिन्हो यांनी उपस्थित केला.

‘त्या’ प्रकाराचा व्हिडिओ सादर ः

पत्रकार परिषदेत या कुतिन्हो यांनी ‘त्या’ आमदाराचा कर्मचारी फाईल्स आणतो, अधिकाऱ्यांच्या सह्या घेतो आणि परत नेतो, असा व्हिडिओच सादर केला. मोती डोंगर झोपडपट्टीतून घर क्रमांक मिळविण्यासाठी १९२ अर्ज आल्याचे सांगण्यात येते.

मग या अर्जाच्या फाईल्स पालिकेतच असायला हव्यात. जर नसतील तर त्या कुठे आहेत, याचे स्पष्टीकरण मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी द्यावे. मुख्याधिकारी पालिकेतील फाईल्स बाहेर नेण्याची परवानगी कुठल्या कायद्याच्या आधारे देतात, याचेही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.

भरपाई मुख्याधिकाऱ्यांनी करावी!

मोती डोंगरावरील घरांना क्रमांक देण्याच्या प्रकरणाबद्दल कुतिन्हो म्हणाले की, हे काम १६ जुलै २०२२ च्या परिपत्रकाप्रमाणे केले जात आहे.

सरकारने परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे ज्या बेकायदा घरांना क्रमांक दिले आहेत, त्यांच्याकडून फेब्रुवारी २०१८ पासूनची घरपट्टी वसूल करणे गरजेचे आहे. मात्र, मडगावचे मुख्याधिकारी केवळ एका वर्षाची घरपट्टी वसूल करून घेत आहेत. त्यामुळे पालिकेला होणारे नुकसान मुख्याधिकाऱ्यांकडून वसूल करावे, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT