Aamthane Dam Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam Update : सतत कोसळधार पावसामुळे आमठाणे धरण ‘फुल्ल’च्या दिशेने!

आमठाणेचा जलसाठा वाढल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विशेषतः उत्तर गोव्यातील जनतेसाठी ही सुखद घटना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : गेल्या चार-पाच दिवसांपासून पडणाऱ्या कोसळधार पावसामुळे ‘आमठाणे’ धरणाच्या पाण्याची पातळी वाढली असून, जलसाठा क्षमतेच्या जवळपास पोचला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन-तीन दिवसांत धरण ‘फुल्ल’ होण्याची शक्यता आहे. तसे संकेतही जलस्रोत खात्याकडून मिळाले आहेत.

आमठाणेचा जलसाठा वाढल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या विशेषतः उत्तर गोव्यातील जनतेसाठी ही सुखद घटना आहे. मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे पाणलोट क्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर जलसाठ्याची क्षमता ५० मीटर एवढी आहे. आज (गुरुवारी) जलसाठ्याने ४९ मी. पातळी गाठल्याची माहिती संबंधित खात्याकडून उपलब्ध झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जलसाठा ४५.५ मीटर एवढा होता. त्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण पसरले होते.

धरणाची पातळी लवकरच ओलांडणार

हवामान बदल त्यातच पाऊस सक्रिय होण्यास झालेला उशीर यामुळे जूनपर्यंत आमठाणे धरणातील जलसाठ्यात अपेक्षेप्रमाणे वाढ झाली नव्हती. गेल्या चार-पाच दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला आहे. हे धरण ‘फुल्ल’ होण्याच्या वाटेवर आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत धरणाची पातळी क्षमता ओलांडण्याची आशा आहे.

-के. पी. नाईक, कार्यकारी अभियंता, डब्ल्यूआरडी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT