पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची १ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला पर्वरी पोलिसांनी महाराष्ट्रातील अमरावती येथून अटक केली आहे.
सुमित इंगोले (२५, अमरावती) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक सीताराम मलिक, हवालदार हेमंत गावकर आणि भिकाजी परब यांच्या पथकाने अमरावतीत जाऊन संशयिताला ताब्यात घेतले.
या सायबर फसवणूक रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या नेटवर्कची पाळेमुळे कुठे रुजली आहेत, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.