Tank In Mormugao Dainik Gomantak
गोवा

Tank In Mormugao: अमोनिया टाकी म्हणजे ‘टाइम बाँब’

सरकारने मॉकड्रिल व अमोनिया साठा टाकीच्या सुरक्षेसंबंधी संयुक्त तपासणी करण्याची गरज असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Tank In Mormugao: जेटी येथील मुरगाव बंदर क्षेत्रामध्ये असलेली अमोनिया साठा टाकी म्हणजे एक ‘टाईम बाँब’ आहे. त्यामुळे सरकारने मॉकड्रिल व टाकीच्या सुरक्षेसंबंधी संयुक्त तपासणी करण्याची गरज असल्याचे मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.

सडा येथे आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या लाडली लक्ष्मी योजनांची मंजुरीपत्रे लाभार्थ्यांना दिल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुरगाव बंदरात अमोनिया टाकी असल्याने त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जाऊ शकत नाही. त्या अमोनिया टाकीसंबंधी नियमितपणे मॉकड्रिल झाल्याचे आम्ही ऐकले नाही.

ज्याप्रमाणे शहर भागातील इंधन साठवणुकीच्या टाक्या दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आल्या, त्याप्रमाणे अमोनिया टाकीही हलविण्यात यावी. द्रव स्वरूपातील अमोनियाची टँकरद्वारे रस्तामार्गे वाहतूक केली जाते. त्यावेळी त्या टँकरच्या मागे एस्कॉर्ट व अग्निशमन दल असावे लागते. हा नियम पाळण्यात येत नसल्याचे ते म्हणाले.

विधानसभा अधिवेशनात शून्य तासाला आपण अमोनिया टाकीचा प्रश्न उपस्थित केला होता. या टाकीच्या आसपास दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे एखादी आपत्ती घडली, तर ती मुरगाव मतदारसंघालाच नव्हे, तर इतर परिसरही प्रभावित करू शकेल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT