Pariksha Pe Charcha : 'परीक्षा म्हणजे उत्सव असावा' -मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मुख्यमंत्री ते बोलत होते.
Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha Dainik Gomantak

Pariksha Pe Charcha: कोणत्याही विद्यार्थ्याने कुठल्याही परीक्षेला घाबरायचे कारण नाही. परीक्षा म्हणजे एक उत्सव असावा. हा उत्सव विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनीही साजरा करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने सन्मानीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे माजी फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखवाळकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार आलेक्स सिक्वेरा, आमदार उल्हास तुयेकर, एनआरआय कमिशनर नरेंद्र सावईकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, गोवा शैक्षणिक मंडळाचे चेअरमन भगीरथ शेटये व उपस्थित होते.

Pariksha Pe Charcha
Sports Ground: कारापूर क्रीडामैदान जागेत कचरा शेड नको !

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की परीक्षा म्हटली की विद्यार्थी घाबरतात, पण तसे होता कामा नये. सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की विद्यार्थ्यांपेक्षा पालक परीक्षेचा जास्त ताण घेतात. पालकांनीसुद्धा तसे न करता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा व त्यांना प्रोत्साहीत करावे.

आमच्या लहानपणात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणीच नव्हते. आताचे विद्यार्थी भाग्यवान आहेत. स्वतः पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. आमच्या लहानपणात आम्हाला आमदार किंवा सरपंचसुद्धा कोण हे माहीत नव्हते, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

मडगावच्या रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमात सात तालुक्यांतील 475 ते 500 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. त्यातून 25 जणांची सर्वोत्तम, 10 जणांची उत्तम गटामध्ये निवड झाली. त्यातील प्रथम तीन सर्वोत्तम चित्रे निवडण्यात आली.

पहिले बक्षीस फोंडा येथील दादा वैद्य हायस्कूलच्या कुणाल नाईक याला, तर दुसरे मुरगावच्या मदर ऑफ मर्सी हायस्कूलमधील कुणाल कौशिक याला व तिसऱ्या बक्षिसासाठी काणकोण येथील कात्यायनी बाणेश्र्वरी हायस्कूलमधील आत्म्या कोमरपंत याची निवड झाली.

चित्रकला स्पर्धेचे परीक्षण श्रीधर कामत बांबोळकर, रचना सोनटक्के मोहन, प्रसाद कांदोळकर, सुनील नाईक, दीपक देसाई, वाय. बी. सुतार व उत्तरा आंगले यांनी केले.

यावेळी पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने सन्मानीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे माजी फुटबॉलपटू ब्रम्हानंद शंखवाळकर यांनी जीवनात प्रगती करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन, तंदुरुस्ती व शिस्त हे महत्त्वाचे घटक असल्याचे सांगितले.

Pariksha Pe Charcha
ATM Security: ‘एटीएम’ मशीन सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमा

पंतप्रधान साधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देशातील विद्यार्थ्यांशी 27 रोजी थेट संवाद साधणार आहेत. त्यासाठी गोव्यातील दोन विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. पंतप्रधान परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यार्थ्यांचा आत्मविश्र्वास वाढविणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गोव्यातील सर्व शाळांमध्ये करण्याची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले.

‘गोवा बहुत अच्छा होना चाहिए’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याबद्दल व्यक्त केलेले प्रेम पद्मश्री ब्रम्हानंद शंखवाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून आपली अनेक पंतप्रधानांशी भेट झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोव्याबद्दल किती प्रेम आहे याची प्रचिती आपल्याला पद्मश्री पुरस्कार घेताना आली.

पंतप्रधान मोदी आपल्या जवळ आले, त्यांनी माझा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला व ‘गोवा कैसा है’ असा प्रश्र्न विचारला. नंतर त्यांनी म्हटले की, ‘गोवा बहुत अच्छा होना चाहिए.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com