Amit Shah In Goa Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa: अमित शहांची सभा! बाणस्तरी येथे पाटकर यांच्यासह काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात

शहांच्या सभेपूर्वी पोलिसांनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

Pramod Yadav

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा गोव्यात दाखल झाले आहेत. अमित शहा दाबोळी विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान, शहांच्या सभेपूर्वी पोलिसांनी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीपूर्वी अमित पाटकर यांच्यासह कॅप्टन विरिएटो, मोरेनो रेबेलो, साव्हियो डिसिल्वा, टोनी डायस आणि इतर काँग्रेस नेत्यांना बाणस्तरी पुलावर ताब्यात घेतले आहे.

गोवा काँग्रेसने अब तो सच बोलो असा हॅशटॅग वापरत काँग्रेस नेत्यांना का ताब्यात घेतले असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, पाटकर यांनी आज सकाळी एक ट्विट केले होते. "भाजप सरकार गोव्यातील जनतेचा विश्वासघात करायचा कधी थांबवणार खरे कधी बोलणार कधी? कर्नाटकात म्हादई वळवणे हे असेच एक भ्रष्ट कृत्य आहे. या डबल इंजिन सरकारने गोमन्तकीयांचा विश्वासघात केला आहे." असे पाटकर यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, शहांची सभा होण्यापूर्वी शहा राज्यातील भाजप नेते आणि मंत्री यांची बैठक घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: गोव्यात मूलभूत सोयीसुविधा ज्या दिवशी निष्पक्षपणे मिळतील, तेव्हा ‘रामराज्य’ आले असे म्हणता येईल

Goa Live News: क्रीडामैदानाच्या बांधकामात घोटाळा नाहीच

Police Attacks Goa: सामान्यांसाठी पोलिसी खाक्या, माफियांसमोर हुजरेगिरी; बेतूल, वास्कोत 'सिंघम'वर झालेले हल्ले

Liquor Seized: ट्रकला लागली 'आग', तस्करीचा झाला पर्दाफाश; धारगळमधून 60 लाखांची दारू जप्त

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती तवडकरांना मिळणार मंत्रीपद, सिक्वेरा देणार राजीनामा; गणेश गांवकराकडे सभापती पदाची धूरा

SCROLL FOR NEXT