Amit Shah In Goa Dainik Gomantak
गोवा

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Amit Shah: अमित शहा यांनी गोव्यातील सांताक्रूझ येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या 'म्हजे घर योजना' (Mhaje Ghar Yojana) च्या भव्य सोहळ्यात गोव्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यातील सांताक्रूझ येथील श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या 'म्हजे घर योजना' (Mhaje Ghar Yojana) च्या भव्य सोहळ्यात बोलताना गोव्यासाठी मोठी घोषणा केली आहे. "गेल्या १५ वर्षांपासून आपम गोव्यात येत आहे. दिवसेंदिवस या राज्याचा होत असलेला विकास माझ्या डोळ्यासमोर दिसतोय. विकसित गोवा पाहण्यासाठी २०४७ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. २०३६-३७ पर्यंत गोवा विकसित राज्य बनेल,” असा विश्वास अमित शहांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमात गोव्यातील नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. शहा यांच्या हस्ते तब्बल २४११ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या १९ विविध विकास प्रकल्पांचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले.

सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर

‘म्हजे घर योजना’च्या माध्यमातून गोव्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळावे, हा राज्य सरकारचा उद्देश असल्याचे शहा यांनी नमूद केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयावर काम करत आहे. गोवा हे देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे राज्य आहे आणि भविष्यात ते विकासाचे आदर्श मॉडेल ठरेल,” असे ते म्हणाले.

परदेशी वस्तू टाळा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी बोलताना नागरिकांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. “या दिवाळीत परदेशी वस्तूंचा वापर टाळा आणि स्थानिक भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्या,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनीही गोव्यातील आगामी विकास प्रकल्पांची माहिती दिली आणि “२०३६ पर्यंत गोवा पूर्णपणे आत्मनिर्भर आणि स्मार्ट राज्य बनेल,” असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa Road Accident: 16 दिवसांत 14 रस्ताबळी, यंदा आतापर्यंत रस्‍त्‍यांवरील अपघातात 249 ठार

Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलिस कोठडी, विशेष निवास व्यवस्था; झोपण्यासाठी मागितलेल्या गादीची मागणी फेटाळली

SCROLL FOR NEXT