Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: शहाविरोधाचे नाटकच ! राज्य सरकारवर विरोधकांची सडकून टीका

म्हादईप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करणारे वक्तव्य मंत्री सुभाष शिरोडकर आणि नीलेश काब्राल यांनी सोमवारी केले होते.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्‍नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करणारे वक्तव्य मंत्री सुभाष शिरोडकर आणि नीलेश काब्राल यांनी सोमवारी केले होते. यावर काल विरोधकांनी राज्य सरकारची ही ‘रीतसर व्यूहरचना’ असल्याची टीका केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अद्यापही शहा यांना दोष दिलेला नाही. परंतु, त्यांची विरोधी सदस्य कोंडी करीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काही मंत्र्यांनी परस्परविरोधी विधाने करावेत, अशी व्यूहरचना भाजपमध्येच आखली जात आहे.

‘सरकारने तमाशा बंद करून म्हादईचे रक्षण करायचे असेल तर त्यांनी राजीनामा देणे उचित ठरेल. त्यामुळेच घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊन केंद्र सरकारवर दबाव येईल; अन्यथा कर्नाटकासाठी गोव्याचा लिलाव होणे अटळ आहे’, असे विधान विरोधी नेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

विरोधी नेत्यांच्या मते...

  • भाजपच्या मंत्र्यांनी वेगवेगळ्या सुरात बोलून गोंधळ निर्माण करावा व विरोधकांची दिशाभूल करावी, असा सुनियोजित कट शिजला आहे.

  • त्याच गोंधळाचा भाग म्हणून मंत्री परस्परविरोधी विधाने करीत सुटले आहेत.

  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत मात्र बाजूला उभे राहून अमित शहा यांच्या विधानाशी सहमती किंवा विरोध काहीच व्यक्त करीत नाहीत, हे विचित्र आहे.

कर्नाटकसाठी प्रश्‍न रखडत ठेवला!

मुख्यमंत्री सध्या झोपलेले आहेत. त्यांना उठविण्यासाठी आता कोविड काळाप्रमाणे ‘थाळी बजाव’ करण्याची गरज आहे. आता इतक्या उशिरा सभागृह समिती नेमून काय फायदा? त्यातून म्हादईचा मुद्दा शीतपेटीत टाकून द्यायलाच मदत होईल.

अन्यथा या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बोलवायची बैठक 8 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली नसती. कर्नाटकची निवडणूक होईपर्यंत, या समितीला हा मुद्दा तसाच रेंगाळत ठेवायचा आहे, असे वाटते असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT