Goa Tourist Crime : बाणावलीत रशियन नागरिकाकडून सॅटेलाइट फोनचा वापर; फोन जप्त करत गुन्हा दाखल

संशयितावर इंडियन वायरलेस अँड टेलिग्राफ अ‍ॅक्ट आणि इंडियन टेलिग्राफी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourist Crime : भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन वापरल्याबद्दल एका रशियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कोलवा पोलिसांकडून करण्यात आली आहे. या कारवाईत सिमकार्डसह सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला आहे.

Goa
Colvale : कोलवाळ पंचायतीच्या उपसरपंचाविरोधात मांडला अविश्वास ठराव

याबाबत कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रशियन नागरिकाकडून भारतात बंदी असलेला सॅटेलाइट फोन वापरला जात असल्याचे आढळून आले. हा रशियन नागरिक बाणावली येथे राहत होता.

पोलिसांनी त्याच्यावर इंडियन वायरलेस अँड टेलिग्राफ अ‍ॅक्ट आणि इंडियन टेलिग्राफी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बाणावली येथून अटक करण्यात आलेल्या रशियन नागरिकाचे नाव संशयित आलेक्सेई कामिनीन (38) असे आहे.

Goa
Vijai Sardesai : भोमा, खोर्ली येथील घरे, मंदिरे वाचविण्यासाठी बगलमार्ग वापरा : सरदेसाई

सॅटेलाइट फोन वापरल्याबद्दल अशीच एक कारवाई काही दिवसांपूर्वी कोलवा पोलिसांनी केली होती. या कारवाईत एका रशियन नागरिकाला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून भारतात बंदी असलेल्या सिमकार्डसह सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Police crime branch investigation news
Russian Woman Marriage Registration
9 Arrested From Goa Cyber Crime
Russian Man Found Dead in Rented Room at Morjim
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com