Nitin Gadkari And Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: अमित पाटकरांचा गडकरींना ईमेल; कामाची यादी देत मागितली भेटीची वेळ

Nitin Gadkari Goa Visit: गोव्यातील रस्ते विशेषत: राष्ट्रीय महामार्ग हे 'मृत्यूचे सापळे' बनले असून सदर रस्त्यांवर दररोज जवळपास एकाचा मृत्यू होत आहे.

Pramod Yadav

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी, 12 जुलै 2024 रोजी गोवा भेटीदरम्यान काँग्रेस शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ देण्याची मागणी करणारा ईमेल पाठवला आहे.

वृत्तपत्रातील बातम्यांचा हवाला देवून अमित पाटकरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी गोवा भेटीच्या वेळी, कॉंग्रेस पक्षाचे आमदार तसेच दक्षिण गोवा खासदार आणि इतर पदाधिकारी यांच्यासमवेत विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे.

गोवा आणि गोमंतकीयांना सतावणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या अखत्यारीतील अनेक समस्या मांडून चर्चा करण्यासाठी अमित पाटकरांनी वेळ देण्याचे त्यांच्या पत्रात लिहिले आहे.

गोव्यातील रस्ते विशेषत: राष्ट्रीय महामार्ग हे 'मृत्यूचे सापळे' बनले असून सदर रस्त्यांवर दररोज जवळपास एकाचा मृत्यू होत आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामुळे रस्ते खड्डे, दरडी कोसळणे आणि जीवघेणे अपघात सुरू आहेत, असे अमित पाटकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

पत्रादेवी - पर्वरी मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाची कामे तसेच कामांचा दर्जा राखण्यासाठी तसेच प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करण्याकडे कंत्राटदाराच्या पूर्ण दुर्लक्ष हे लोकांच्या रोषाचे प्रमुख कारण बनले आहे. गोवा राज्यात सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या रस्त्यांच्या विस्तारीकरणाच्या कामांबद्दल लोकांमध्ये चीड आहे असे अमित पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे.

काँग्रेसने पत्रादेवी ते पर्वरी महामार्ग विस्तारीकरणाचे काम, पर्वरी ते पणजी उड्डाणपुलाचे बांधकाम, गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात प्रवेश घेताना येणारे अडथळे, भोमा गावातून जाणारा ऑल्ड गोवा ते उसगाव महामार्गाचा विस्तार, नुवें ते नावेली राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम, नावेली ते कुंकळ्ळी महामार्ग यासारख्या रस्त्यांची व महामार्गांची यादी पत्रात देण्यात आली आहे.

तसेच कुंकळ्ळी बायपास, कुंकळ्ळी ते काणकोण महामार्गाचे विस्तारीकरण, मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून कोळसा वाहतूक, झुआरी पुलाच्या मधोमध टॉवर बांधणे, बोरी पुलाचे बांधकाम, बोरी गावातून जाणारा महामार्ग विस्तारीकरण याकडे पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे लक्ष वेधण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात रंगणार 9वा 'Aqua Goa Mega Fish Festival'; मच्छिमारांच्या प्रगतीसाठी 40% सबसिडीची घोषणा

अग्रलेख: गोवा मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही आपल्याला शेतं, डोंगर, पाण्याचे स्रोत, समुद्र किनारे यावर चर्चा करावी लागते, यासारखे दुर्दैव नाही

Harvalem: 'रवींच्या स्वप्नासाठी भंडारी समाजाने एकत्रित यावे'! ब्रह्मेशानंद स्वामींचे आवाहन; रुद्रेश्वर रथयात्रा वर्षपूर्ती सोहळा साजरा

ऑफिसमध्ये फक्त कामच! कामाच्या वेळी 'बर्थडे' आणि 'फेअरवेल' साजरे करण्यावर बंदी

Goa Live News: तुये हॉस्पिटल 100% 'जीएमसी'शी जोडले जाणार

SCROLL FOR NEXT