Amit Patkar News | Goa Congress News Dainik Gomantak
गोवा

‘आयआयटीसाठी शेतजमीनच का हवी?’; काँग्रेसचा सवाल

हा प्रकल्प फर्मागुढी येथील पठारावर नेला पाहिजे, अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात आयआयटी प्रकल्प आणण्यासाठी सरकार आतूर असून प्रकल्प चांगला आहे, परंतु त्यासाठी सरकारला केवळ शेतजमीन कशी काय मिळते हा मोठा प्रश्‍न आहे. आमच्या शेतीवर आमच्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यासाठी हा प्रकल्प फर्मागुढी येथील पठारावर नेला पाहिजे, अशी सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

सुरुवातीला प्रकल्प काणकोण येथे प्रस्तावित होता, परंतु तेथे विरोध झाल्यानंतर सांगे येथे नेण्यात आला होता. सांगेतदेखील विरोध झाल्यानंतर प्रकल्प सत्तरी येथील शेळ - मेळावली येथे नेण्यात आला. मात्र, तेथेही जोरदोर विरोध झाल्यानंतर आता पुन्हा प्रकल्प सांगेला नेण्यात आला आहे. आता तेथे पुन्हा काही लोकांकडून विरोध होत असल्याने शेतजमिनीवर हा प्रकल्प कशासाठी असा प्रश्‍न आहे, असे पाटकर म्हणाले.

दरम्यान फोंड्याजवळील फर्मागुढी येथे गोवा सरकारची लाखो चौरस मीटर जमीन असून तेथे हा प्रकल्प का आणला जात नाही, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. आयआयटी प्रकल्पावरुन गोव्यात सध्या वातावरण तापलं असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT