Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: आमोणकर भाजपचे खंडणी मंत्री आहेत का? पाटकरांचा टोला

‘खंडणी माफिया’ला मिळतेय प्रोत्साहन

दैनिक गोमन्तक

Amit Patkar Slams BJP Government

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणी मंत्री आहेत का, असा प्रश्न करून मुरगाव पोर्ट ट्रस्टमधील दादागिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

खंडणीसाठी दादागिरी हे भाजपचे बिझनेस मॉडेल आहे. मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे खंडणी रॅकेटचे भागधारक आहेत आणि त्यामुळेच त्यांनी मौन बाळगले आहे, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

मुरगाव बंदरावरून बॉक्साईटच्या वाहतुकीला भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनी अडवणूक केल्याच्या प्रसारमाध्यमांच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना पाटकर यांनी गोव्यातील ‘खंडणी माफिया’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपवर केला आहे.

बॉक्साईटची वाहतूक मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी दहा दिवसांहून अधिक काळ रोखून धरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने याकडे डोळेझाक केली, असे अमित पाटकर म्हणाले.

गोमंतकीयांनी सावध व्हावे!

भाजप प्रत्येक गोष्टीत माया कमावण्याची संधी शोधत असतो. भाजपने खंडणीखोरांना प्रशिक्षित केले आहे. जे छोट्या भाजी विक्रेत्यांपासून मोठ्या व्यावसायिकांकडून ‘हफ्ता’ गोळा करतात, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सदानंद शेट तानावडे हे भाजपच्या ‘खंडणी माफिया’चे मुख्य आश्रयदाते आहेत. गोमंतकीयांनी आताच सावध व्हावे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवावा, असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT