Goa Congress President Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar : पाण्याच्या टॅंकरमधून सांडपाण्याची वाहतूक का केली जाते ?

पाटकर : सरकारच्या कारभारावर टीका

दैनिक गोमन्तक डिजिटल

असंवेदनशील भाजप सरकार आणि अकार्यक्षम सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल हे "हर घर जल'' देण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर आता पाण्याच्या टॅंकरमधून सांडपाण्याची वाहतूक का केली जाते ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

सांकवाळ येथील रहिवाशांनी सांडपाणी वाहून नेणारा पाण्याचा टँकर पकडल्याच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारकडून कोणतीही आशा नसल्यामुळे लोकांनीच आता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सांडपाण्याने भरलेला पाण्याचा टँकर रंगेहाथ पकडणाऱ्या सांकवाळ येथील रहिवाशांचे मी अभिनंदन करतो. भाजप सरकार गोव्यातील सांडपाणी माफियांना प्रोत्साहन देत आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने गोव्याला १०० टक्के ‘ओपन डेफिकेशन फ्री’ आणि १०० टक्के "नळाची जोडणी असलेले राज्य घोषित करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. वास्तव हे आहे की सरकारचे दोन्ही दावे जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे,असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT