Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेसचेही कार्यालय तयार, निधी मिळताच उद्‌घाटन करू; अमित पाटकरांची माहिती

Amit Patkar Goa Congress: गोवा भाजप कार्यालयाच्या उद्‌घाटनापूर्वी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्‌घाटन करू, असे आपण प्रदेशाध्यक्ष असताना जाहीर केले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा भाजप कार्यालयाच्या उद्‌घाटनापूर्वी काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचे उद्‌घाटन करू, असे आपण प्रदेशाध्यक्ष असताना जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच आपल्याला प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले.

प्रदेश काँग्रेसचे नवे कार्यालय तयार असून, त्यासाठी पक्षाने निधी उपलब्ध करून दिल्यास उद्याही त्याचे उद्‌घाटन करता येईल, असे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कार्यालयाचे उद्‌घाटन हा पक्षाचा निर्णय असून, त्यासाठी केवळ दोन मिनिटांचा वेळ लागतो, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

भाजपच्‍या नव्‍या कार्यालयाच्‍या उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नव्या कार्यालयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राज्यात अनेक वर्षे सत्ता गाजविलेल्या काँग्रेसकडे अद्याप सुसज्ज असे स्वतंत्र कार्यालय नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनही नव्या कार्यालयाची मागणी होत आहे.

दरम्‍यान, भाजप नेते रुपेश कामत यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसच्या कार्यालयाची इमारत तयार असूनही केंद्रीय नेतृत्वाने त्यासाठी निधी का दिला नाही, असा सवाल त्यांनी अमित पाटकर यांच्या विधानाचा संदर्भ देत केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT