Amit patkar Dainik Gomantak
गोवा

Hunger Index मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे योगदान; अमित पाटकरांची खोचक टीका

गोवा सरकारने हजारो टन तूर डाळ आणि साखरेचा नाश केल्याचा आरोप करत लगावला टोला

दैनिक गोमन्तक

पणजी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मित्र गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले असतानाच, जागतिक भूक निर्देशांक 2022 मध्ये भारत 121 देशांमध्ये 107 व्या क्रमांकावर आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने हजारो टन तूरडाळ आणि साखरेचा नाश करुन भारताच्या क्रमवारीसाठी योगदान दिले, असा टोला काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला आहे.

(Amit Patkar criticizes CM Pramod Sawant over Global Hunger Index)

भारताची समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील दरी भाजप सरकारच्या गेल्या आठ वर्षांतील लोकविरोधी धोरणांमुळे तयार झाली आहे. बेरोजगारीच्या दरात होणारी चिंताजनक वाढ हे देखील उपासमारीचे कारण आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ असे घोषवाक्य दिले होते. आज या घोषणेचा दुसरा भाग प्रत्यक्षात आला आहे, अशी टीका अमित पाटकर यांनी केली.

गोवा, हरियाणा आणि इतर राज्यांतील भाजप सरकारनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलदार मित्राला जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनवण्याच्या प्रयत्नात हातभार लावला आहे. तसेच गोव्यात हजारो टन अन्नधान्य वाया घालवून भूक निर्देशांकात भारताला 107 व्या क्रमांकावर ढकलले, असा दावा अमित पाटकर यांनी केला.

तूरडाळी सारखे अन्नधान्य आयात करून भांडवलदारांना माया कमावण्यासाठी अन्नधान्याची नासाडी जाणीवपूर्वक करण्यात आली. उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरीने भाजप सरकारचा श्रीमंतांच्या हिताचा आणि गरीब विरोधी अजेंडा उघड केला आहे.

त्यामुळे भाजपच्या गेमप्लॅनचा जनतेने विचार करावा. पर्यावरण, जंगल, वन्यजीव यांचा नाश करणाऱ्या मेगा प्रकल्पांचे प्रस्ताव पुढे ढकलण्यात मदत होण्यासाठी आमदारांना विकत घेण्यास हेच भांडवलदार भाजपला निधी देत ​​आहेत. मोलमजुरी करणारे गरिब मात्र या राजकीय डावपेचात उपाशी राहतो असे अमित पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT