Amit Palekar said that BJP was defeated in South Goa constituency due to taking the voters for granted  Dainik Gomantak
गोवा

Amit Palekar: 'गोव्यात मोदींची जादू चालली नाही, मतदारांना गृहीत धरणं भाजपला पडलं महागात'; अमित पालेकरांचा घणाघात

Goa Loksabha Election Result: भाजपविरोधात इंडिया आघाडीने एकत्रित येऊन ही निवडणूक लढविली त्याचा फायदा दक्षिणेत झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Loksabha Election Result: भाजपविरोधात इंडिया आघाडीने एकत्रित येऊन ही निवडणूक लढविली त्याचा फायदा दक्षिणेत झाला. भाजप नेहमीच मतदारांना गृहीत धरले आहे त्याचा परिणाम दक्षिणेत त्यांना भोगावा लागला आहे. दोन्ही जागा जिंकण्याची मोदींची जादू गोव्यात चालली नाही, असे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

आम आदमी पक्षासह इतर पक्षाच्या नेत्यांनी शिस्तबद्धरीतीने काम केले. त्यामुळे भाजपला येथे मुसंडी मारता आली नाही. उत्तर गोव्यात आम आदमी पक्षाने काम केले. मी स्वतः या जिल्ह्यात प्रचार केला. उत्तरेतील कुंभारजुवे व सांताक्रुझ मतदारसंघात इंडी आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. सांताक्रुझमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे मी समाधानी आहे, असेही ते म्हणाले.

जनतेचा कौल मान्य: मुख्यमंत्री

देशात तसेच गोव्यात जनतेने जो कौल दिला आहे, तो मान्य आहे. दक्षिणेतील काही विशेष मतदारसंघातून अधिक मते मिळण्याची अपेक्षा होती, पण आमचा अपेक्षाभंग झाला. आम्ही जरी हरलो असलो, तरी आमच्या मतांमध्ये वाढ होऊन ती २ लाखांहून अधिक मिळाली आहेत. उत्तरेत भाजपचा विजय निर्विवाद होता व दक्षिणेतही जिंकू असा विश्‍वास होता.

मात्र, काही मतांनी हरलो असलो, तरी संघटनात्मक काम मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात सुरूच राहणार आहे. उत्तर गोव्यात ५६ टक्के मतदान मिळून पूर्ण बहुमत मिळाले आहे. उत्तरेत १६ मतदारसंघामध्ये, तर दक्षिणेत ११ मतदारसंघात मतांची आघाडी भाजपच्या उमेदवारांना मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT