Ambulance road blocked by trees in Sanguem Dainik Gomantak
गोवा

सांगेमध्ये झाडांनी रोखला रुग्णवाहिकेचा रस्ता

तब्बल दोन तासांचा थरार: भाटीचे माजी सरपंच गावकर यांनी केले मदतकार्य

दैनिक गोमन्तक

सांगे: धो धो पाऊस, वादळी वारे, वीज नाही, मोबाईलला नेटवर्क नाही अन कानठळ्या बसवणारा विजांचा आवाज. अशा आपत्कालीन स्थितीत कोणालाही संपर्क करणे शक्य नव्हते. अशा कठीण परिस्थितीतही भाटीचे माजी उपसरपंच चंद्रकांत गावकर यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन झाडांनी वेढलेल्या रुग्णवाहिकेचा रस्ता मोकळा केला. सलग दोन तास हा थरार सुरू होता. अवकाळी पावसाने सांगे भागाला झोडपून काढले. त्यामुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली. विलियण भाटी येथील मुख्य रस्त्यालगत वीज वाहिन्यावर काजूचे झाड पडल्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद झाला, तर वालंकिणी येथील मुख्य रस्त्यावर फणसाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. यातच तुडव-नेत्रावळी येथील रुग्णाला घेऊन आलेली १०८ रुग्णवाहिका अडकून पडली. वीज नाही, मोबाईलला नेटवर्क नाही अन कानठळ्या बसणाऱ्या विजांमुळे कोणालाही संपर्क करणे शक्य झाले नाही.

नेटवर्कअभावी मदतकार्यात अडथळा

रात्री साडेनऊच्या सुमारास जोरदार पाऊस, वादळी वारे, सोबतच वीज कडाडू लागल्याने घबराट निर्माण झाली असतानाच मुख्य रस्त्यालगतची झाडे वीज खांबांवर कोसळल्याने वीज गुल झाली आणि वाहतूकही ठप्प झाली. झाला. ग्रामीण भाग असल्यामुळे बीएसएनएलशिवाय अन्य कोणतेही नेटवर्क येथे चालत नाही. त्यात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे तासभर अग्निशमन दलाला संपर्क करणे कठीण झाले.

रुग्णासाठी प्रयत्नांची शिकस्त

छातीत कळ आल्यामुळे एका रुग्णाला रुग्णवाहिकेतून इस्पितळाकडे नेले जात होते. पण वाटेत झाडे पडली असल्याने रस्त्यावरील प्रत्येकाचा जीव तळमळू लागला. अखेर भाटीचे माजी उपसरपंच चंद्रकांत गावकर यांनी सहकाऱ्यांना घेऊन रुग्णवाहिका सुटू शकेल इतका रस्ता मोकळा करून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT