शिवोलीत कारवर कोसळले झाड

वादळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या
 tree fell on car in Siolim
tree fell on car in SiolimDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: सोमवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे कळंगुट तसेच शिवोली पंचक्रोशीतील लोकांची त्रेधातिरपीट उडाली. या परिसरातील झाडे तसेच झाडांच्या फांद्या घरांवर तसेच पार्क केलेल्या वाहनांवर कोसळून अनेकांचे नुकसान झाले. त्यातच रात्री दहाच्या सुमारास गुल झालेली वीज मध्यरात्रीपर्यंत न आल्याने लोकांची उकाड्यामुळे बरीच घालमेल झाली. कळंगुटमधील नाईकवाडा तसेच परिसरात वादळी वाऱ्याने झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने रात्री दोन तास या भागातील वाहतूक ठप्प झाली. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत रस्त्यावरील झाडे तसेच फांद्या हटविल्या. मंगळवारी वीजपुरवठा सुरळीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
moira bar sword attack case suspects acquitted goa
together for mhapsa complaint samuel braganza suicide case
Samuel Braganza Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com