Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Goa Viral Video: सरकारी रूग्णवाहिकेतून साहित्य वाहतूक? व्हिडिओ व्हायरल, आरोग्य मंत्री म्हणतात...

अत्यावश्यक सेवेत असलेली रूग्णवाहिका साहित्य वाहतूक कशी करू शकते असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Pramod Yadav

सराकारी रूग्णवाहिकेतून साहित्य वाहतूक केली जात असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. कालपासून हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. गोवा परवाना असलेल्या या रूग्णवाहिकेवर भारत सरकार असे लिहले आहे.

अत्यावश्यक सेवेत असलेली रूग्णवाहिका (Ambulance) साहित्य वाहतूक कशी करू शकते असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याबाबत समोर आलेल्या व्हिडिओत GA 08 G 5072 या क्रमांकाची रूग्णवाहिका वस्तू वाहतूक करताना दिसत आहे. काही कर्मचारी रूग्णवाहिकेत काहीतरी साहित्य असेलल्या गोणी भरताना दिसत आहेत. रूग्णवाहिकेचे चालक त्यानंतर दार बंद करून रूग्णवाहिका तेथून घेऊन जातो असे व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, ही रूग्णवाहिका आरोग्य खात्याची (Health Dept)) नाही तसेच, ती गोवा राज्य आरोग्य संचालनालयाच्या (Goa Health Department) अखत्यारीतील नाही. ही रूग्णवाहिका दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काणकोण येथील नवोदय विद्यालयाला दिली आहे. असा खुलासा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी केला आहे.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी याबाबत ट्विट (Twitter) देखील केले आहे. लवकरात लवकर या रूग्णवाहिकेचा परवाना रद्द करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी (South Goa Collector) कार्यालयाला पत्र लिहले असल्याचे ट्विट आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT