Ambergris Seized In Goa Dainik Gomantak
गोवा

Ambergris Seized In Goa: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! सांगेत दहा कोटींचे 'अंबरग्रीस' जप्त; सावंतवाडीच्या एकासह तिघांना अटक

Goa Police Ambergris Case: सांगे येथे देवमासा (Sperm Whale) उलटीच्या (Ambergris) मोठ्या प्रमाणावर जप्तीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली.

Manish Jadhav

सांगे: सांगे येथे देवमासा (Sperm Whale) उलटीच्या (Ambergris) मोठ्या प्रमाणावर जप्तीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या उलटीची बाजारभावानुसार अंदाजे किंमत सुमारे 10 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिसांनी साईनाथ सेठ (वय 50, फोंडा), रत्नाकांत कारापुरकर (वय 60, मुरगाव) आणि योगेश रेडकर (वय 40, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. सांगे पोलिसांनी या तिघांना एका संशयास्पद वाहनातून अंबरग्रीस वाहतूक करत असताना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, अंबरग्रीसची तस्करी ही वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो.

न्यायालयात हजर करण्यात येणार

दरम्यान, तिघांनाही अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात (Court) हजर करण्यात येणार असून पुढील तपास वनविभाग आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या समन्वयाने करण्यात येईल. पोलिसांनी अंबरग्रीस कुठून आणले? कुणाला विक्री करणार होते? याचा तपास सुरू केला आहे.

देवमासा उलटी अर्थात अंबरग्रीस ही सुगंधी पदार्थासाठी वापरली जाणारी महागडी वस्तू असून ती कायद्याने प्रतिबंधित आहे. तिची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे बेकायदेशीर तस्करीचे प्रकार वाढत आहेत. सांगे पोलिसांची ही कारवाई मोठे यश मानले जात असून आणखी आरोपी असण्याची शक्यता गृहित धरुन तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT