Goa Government | Amarnath Panajikar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: मशाल प्रज्वलनावर क्रीडा संघटनांचा बहिष्कार म्हणजे भाजप सरकारला 'चपराक' : अमरनाथ पणजीकर

आश्वासन देऊनही शिबिर, उपकरणे खरेदीसाठी निधी रखडला

दैनिक गोमन्तक

37th National Games Goa 2023: क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीतील गोंधळावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्पर्धा मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर विविध क्रीडा संघटनांनी जाहिर केलेला बहिष्कार हे भ्रष्ट भाजप सरकारला चपराक आहे, असा टोला काँग्रेस मीडिया सेलचे प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला.

"गोव्यातील विविध क्रिडा संघटनाना क्रिडा उपकरणे घेण्यासाठी 19 कोटी देणे बाकी असल्याचे क्रिडामंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांसमोर मान्य केले. क्रिडामंत्री या अगोदर खोटे बोलत होते. क्रिडा संघटनांना दोष देण्याचा अधिकार सरकारला नाही" असे पणजीकर म्हणाले.

"सरकारकडे आमदारांना सवलती, भत्ते तसेच इव्हेंट करण्यासाठी निधी आहे परंतू खेळाडूंना देण्यासाठी पैसे नाहीत हे उघड केले होते. हा दावा गोव्याच्या क्रीडा संघटनांनी खरा असल्याचे सिद्ध केले आहे."

क्रीडा संघटना आणि खेळाडूंना देण्यासाठी सरकारकडे निधी नाही मात्र सरकार कार्यक्रमांवर खर्च करत आहे? राष्ट्रीय खेळांच्या तारखा जाहीर झाल्या नसताना त्यांनी "लोगो" आणि "मॅस्कोट" अनावरण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले. आता ते या ‘स्पर्धा मशाल प्रज्वलन कार्यक्रमा’चे आयोजन करत आहेत. हे फक्त ‘मिशन टोटल कमिशन’साठी आहे, असा आरोप पणजीकर यांनी सरकारवर केला.

"हीच वृत्ती कायम राहिल्यास राष्ट्रीय क्रिडा स्पर्धांच्या गोव्याच्या ‘मेडल टॅली’वर परिणाम होईल. कोणत्याही खेळाडूने जिंकलेले पदक त्याच्या वैयक्तिक प्रयत्नांवर असेल त्याचे श्रेय घेण्याचा अधिकार सरकारला नाही," असे पणीकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT