37th National Games Goa 2023: राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमावर क्रीडा संघटनांचा बहिष्कार

गोवा क्रीडा प्राधिकरणाचा निषेध : आश्वासन देऊनही शिबिर, उपकरणे खरेदीसाठी निधी रखडला
37th National Games Goa
37th National Games GoaDainik Gomantak
Published on
Updated on

37th National Games Goa 2023: गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त गोवा क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे केवळ कार्यक्रम घेण्यावर मग्न असताना, खेळाडूंसाठी प्रशिक्षण-सराव शिबिरे, क्रीडा उपकरणे खरेदीसाठी विविध संघटनांना निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊनही अजून ते पाळलेले नाही.

त्याचा गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या झेंड्याखाली विविध खेळांच्या राज्य संघटनांनी तीव्र निषेध नोंदविताना शुक्रवारी (ता. ८) होणाऱ्या स्पर्धा मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गुरुवारी घेतला.

खेळाडूंसाठी राज्य सरकारने अजून निधी पुरवलेला नाही. त्यामुळे निवासी शिबिर सुरू करणे अशक्य असल्याचे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याची माहिती जीओए सचिव गुरुदत्त भक्ता यांनी दिली. त्यातून मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यावर एकमत झाल्याचे भक्ता यांनी नमूद केले.

37th National Games Goa
Goa Nurse Missing: 2 दिवसांपासून बेपत्ता असलेली गोव्यातील नर्स सुखरूप परतली घरी

शिबिरासाठी निधीची प्रतीक्षाच

‘जीओए’च्या प्रसिद्धी पत्रकानुसार, गोवा क्रीडा प्राधिकरणाने नऊ सप्टेंबरपासून सर्व क्रीडा संघटनांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त 45 दिवसीय निवासी शिबिर घेण्यासाठी परवानगी दिली होती.

मात्र, त्यासाठी आवश्यक निधी आगावू देणे अजूनही मंजूर झालेले नाही. एकंदरीत हा प्रश्न फाईलबंद आहे. खेळाडूंच्या तयारीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, याकडे भक्ता यांनी लक्ष वेधले.

37th National Games Goa
Military Engineering Services Goa: स्लॅब कोसळून कामगार जागीच ठार, मांगोरहील येथील दुर्दैवी घटना

सरावासाठी 29 संघटनांची असमर्थता

‘जीओए’ सचिव गुरुदत्त भक्ता यांनी गुरुवारी क्रीडा संघटनांना राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीनिमित्त भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला.

‘जीओए’शी संलग्न ३२ पैकी २९ खेळांच्या क्रीडा संघटनांनी नऊ सप्टेंबरपासून खेळाडूंसाठी निवासी प्रशिक्षण-सराव शिबिर सुरू करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com