अमरनाथ पणजीकर Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "भाजप नेत्यांकडून कायद्याचे उल्लंघन व देवाचा अपमान" अमरनाथ पणजीकर यांचे गंभीर आरोप!

मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या "रामराज्य दिग्विजय रथ" वाहनाला गोव्यात प्रवेश कसा दिला याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो देतील का?

दैनिक गोमन्तक

पणजी: महात्माजींचे शेवटचे शब्द होते ‘हे राम’. प्रत्येक भारतीयाला ‘रामराज्य’ हवे आहे. दुर्दैवाने श्रीरामाच्या नावाने नियमांचे उल्लंघन केले जाते. मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या "रामराज्य दिग्विजय रथ" वाहनाला गोव्यात प्रवेश कसा दिला याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो देतील का?, असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला.

(Amarnath Panajikar is seriously accused of violating the law and insulting God by BJP leaders)

आज गोव्यात दाखल झालेल्या व मुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री, माजी मुख्यमंत्री, विद्यमान आणि माजी आमदार आणि इतर भाजप नेत्यांनी ठळकपणे स्वागत केलेल्या वाहतूक नियम मोडणाऱ्या रामराज्य रथयात्रेच्या वाहनासंबंधी अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस मीडिया सेलच्या अध्यक्षांनी श्री मारुती मंदिर, दवर्ली, मडगाव येथे मंत्री रवी नाईक व निलेश काब्राल, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेंकर, आलेक्स रेजिनाल्डो लॉरेन्सो, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ ​​बाबू कवळेकर आणि इतरांनी देव हनुमानाकडे पाठ फिरवून काढलेल्या छायाचित्रावरही आक्षेप घेतला आहे.

"भाजप नेत्यांनी प्रसारित केलेले छायाचित्र श्री मारुती मंदिर, दवर्ली-मडगाव येथील आहे. प्रसिद्धीसाठी हपापलेले भाजप नेते, मंत्री, माजी मुख्यमंत्री, आमदार आणि माजी आमदार रामराज्य रथयात्रा कार्यक्रमावेळी भगवान श्रीहनुमानाला पाठ करून फोटो काढतात. देवाचाच विश्वासघात करणाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा धरावी? असा टोला अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

मंदिरात व प्रार्थनास्थळी देवाच्या मूर्तीसमोर बसणे ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. भाजप नेते भगवान श्रीरामाचे नाव राजकीय फायदा घेण्यासाठी वापरत आहेत हे घृणास्पद आहे. स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते नियमांचे उल्लंघन करतात, देवाचा अपमान करतात. भाजप नेत्यांच्या कृतीने रामराज्य नक्कीच येणार नाही; त्यामुळे रावणराज्याचा प्रचार होईल, असा आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला.

जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा भाजप अशा यात्रा काढते. काही वर्षांपूर्वी भाजपचे आताचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. भाजपला मदत करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी लाखो विटा गोळा केल्या होत्या. आज, सदर मंदिराचे संगमरवरी बांधकाम सुरू आहे. लोकांनी श्रद्धेने आपल्या देवघरात पुजून दिलेल्या लाखो विटांचे काय झाले? असा सवाल अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.

नेहमी इतरांना उपदेश देणारे वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी आता तोंड उघडावे आणि गोव्याच्या रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना परवानगी कशी देण्यात आली याचे स्पष्टीकरण गोमंतकीयांना द्यावे, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT