Land Scam In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Land Scam|जमीन हडपप्रकरणी कारवाईचे अन्य पर्याय शोधावेत: आयरिश

आयरिश म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आश्रयाने जमीन हडप करण्याची प्रकरणे सुरू आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकावर (एसआयटी) देखरेख ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. मात्र, राज्यात उच्च न्यायालयाचे अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित निवृत्त न्यायाधीश असताना औरंगाबाद येथील न्यायाधीशांची नियुक्ती का केली असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

(Alternatives to action should be explored in land grab cases in Goa)

आयरिश म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय आश्रयाने जमीन हडप करण्याची प्रकरणे सुरू आहेत. यात विविध राजकीय पक्षांचे मंत्री, नेते, आमदार सहभागी आहेत. मात्र, यापैकी कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे तपासाच्या निष्पक्षता आणि स्वातंत्र्यावर गंभीर शंका आणि प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणांमध्ये कागदपत्रांसह मालमत्तेचे विक्री आणि हस्तांतरण नंतरची सर्व फसवणूक ही महसूल, अभिलेखागार, काही वकील, नोटरी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहभागाने आणि संगनमताने अनेक दिवसांपासून सुरू आहे. या सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन संबंधित मालमत्ता योग्य त्या मालकांना परत मिळणे महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT