Goa Congress| काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा उद्यापासून

अनुमा आचार्य : कन्याकुमारी ते काश्मीर; 3 हजार 570 किलोमीटर अंतर
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गरीब - श्रीमंतातील फरक, सामाजिक ध्रुवीकरण आणि सत्तेचे केंद्रीकरण असे तीन आजार सध्या देशात जडलेले आहेत. या आजारांपासून मुक्ती मिळविण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे. त्यासाठी काँग्रेसबरोबर देशातील जनतेने जोडले जावे आणि केंद्रातील भाजप सरकारला 2024 मध्ये सत्तेवरून खेचले जावे यासाठी जागृतीचा एक भाग म्हणून काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो’ ही यात्रा असल्याचे माजी विंग कमांडर अनुमा आचार्य यांनी सांगितले.

(Congress' 'Bharat Jodo' Yatra from tomorrow in goa)

Goa Congress
Goa Corona Update| कोरोनामुळे एकाचा मृत्यू, पाच जण रुग्णालयात

भारत जोडो यात्रेमागील उद्देश त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केला. काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, सरचिटणीस सुनील कवठणकर, उत्तर-दक्षिण जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उपस्थित होते.

आचार्य म्हणाल्या की, देशातील मोजक्याच लोकांकडे देशाच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती आहे. केंद्र सरकार ज्या ठिकाणी भाजपची सत्ता नाही, त्या ठिकाणच्या राज्य सरकारांना त्रास देण्याचे काम सुरू झाले आहे.

Goa Congress
Sonali Phogat Case : सोनाली हत्या प्रकरणात संशयितांच्या कोठडीत वाढ

अभिव्यक्तीला आळा घातला जात आहे. त्याशिवाय राज्यातील सरकार पाडण्याचे आणि त्या ठिकाणी भाजपचे सरकार आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्याशिवाय महिला असुरक्षित आहेत.

पाच महिन्यांची यात्रा

सुरवातीला यात्रेविषयी माहिती देताना पाटकर म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेसची दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ७ तारखेपासून ‘भारत जोडो यात्रे’ला प्रारंभ होणार आहे. 30 हजार 570 किलोमीटर अशी ही कन्याकुमारी ते काश्‍मीर भारत जोडो यात्रेस राष्ट्रीय नेते राहुल गांधी सुरवात करणार आहेत. त्यासाठी या यात्रेच्या जागृतीसाठी देशभरात 30 ठिकाणी काँग्रेस माहिती देत आहे. पाच महिने ही यात्रा चालणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com