हिंदी साहित्य Dainik Gomantak
गोवा

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्यसैनिकांसोबत हिंदी साहित्याचे योगदान

प्रो. राम परिहार: ‘स्वातंत्र्य चळवळ व हिंदी साहित्य’वर वेबिनार

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्यसैनिकांसोबत हिंदी साहित्यिकांनीही योगदान दिले आहे. हिंदी साहित्यिकांनी त्यांच्या मातृभाषेतून मातृभूमी आणि भारत मातेची सेवा करणाऱ्या नागरिकांमध्ये चेतना निर्माण करण्याचे काम केले,असे प्रतिपादन खंडवा(मध्यप्रदेश) येथील हिंदी साहित्यिक प्रो. राम परिहार यांनी केले.

स्वातंत्र्यलढ्याच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त गोवा विद्यापीठाच्या, हिंदी विभाग आणि अरविंद पांडे मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्य चळवळ आणि हिंदी साहित्य” या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते उद्‍घाटक म्हणून बोलत होते.

उत्तरप्रदेशचे प्रो. सूर्यप्रसाद दीक्षित, आणि आमंत्रित वक्ते म्हणून पाँडिचेरी विद्यापीठाच्या प्रो.पद्मप्रिया, दिल्ली विद्यापीठाचे पुरणचंद टंडन हे उपस्थित होते.

परिहार म्हणाले,की स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्यसैनिकांसोबत हिंदी साहित्यिकांनीही योगदान दिले आहे. यात भारतेंदु हरिश्चंद्र मुंशी प्रेमचंद, सुभद्रा कुमारी चौहान, रामवृक्ष बेनिपुरी, माखनलाल चतुर्वेदी, जयशंकर प्रसाद, आणि इतर विशेष लेखकांचा समावेश आहे. स्वातंत्र्यासाठी महावीर प्रसाद द्विवेदी यांची सरस्वती पत्रिका या क्षेत्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावत होती.

प्रो. सूर्यप्रसाद दीक्षित यांनी सांगितले,की झाशीच्या राणीची कविता पाहायला मिळाली. या कवितेने सर्वसामान्यांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली आणि भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांविरुद्ध चेतना निर्माण करण्याचे काम केले. वेबिनारचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्राचा विषय होता “स्वातंत्र्य चळवळ आणि हिंदी कविता आणि कथा साहित्य” या सत्रात एकूण 8 वक्तत्यांनी आपले शोधनिबंध सादर केले.

डॉ. आशा गहलोत यांनी हिन्दी कविता आणि माखनलाल चतुर्वेदी यांचे योगदान अधोरेखित करताना सांगितले की, माखनलाल यांच्या अनेक कविता मध्ये देशाची तत्कालीन समस्या आणि जनतेला जागृत करण्याचे धाडस पाहायला मिळते. उद्‍घाटन सत्राचे संचालन प्रा. ममता वेर्लेकर यांनी केले,तर समारोप सत्राचे संचालन सहायक प्रा. मनीषा गावडी यांनी केले. प्रथम सत्राचे संचालन दीपक वरक यांनी केले.दुसऱ्या सत्राचे संचालन सहायक प्राध्यापीका श्वेता गोवेकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT