मराठी साहित्यातील कोहिनूर: विष्णु वामन शिरवाडकर

प्राची जोशी: गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे जागतिक मराठी भाषादिन
 Vishnu Vaman Shirwadkar
Vishnu Vaman ShirwadkarDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील कोहिनूर हिरा होते. त्‍यांनी मानवी मनातील भावना विकसित केल्या. भावभावनांचा आविष्कार जीवनाचे सार कमी शब्दात आणि जास्त आशयातून ये हृदयीचे त्या हृदयी पोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे प्रतिपादन पणजीच्या धेंपे महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्राची जोशी यांनी केले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी आणि प्रागतिक विचार मंच गोवा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज सदर फोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजित केलेल्या जागतिक मराठी भाषादिन कार्यक्रमात प्रा. डॉ. प्राची जोशी कुसुमाग्रजांच्या समग्र साहित्यावर व्याख्याने देताना बोलत होत्या.

 Vishnu Vaman Shirwadkar
मराठी साहित्य सांस्‍कृतिक संमेलन पार पडले उत्साहात

याप्रसंगी मराठी भाषेचे जाज्वल्य प्रेमी गो. रा. ढवळीकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष जयवंत आडपईकर, सदर फोंडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष राया बोरकर उपस्थित होते.

प्रा. डॉ. जोशी पुढे म्हणाल्या, की कुसुमाग्रजांचा पिंड हा आत्मनिष्ठ कवींचा मूर्तापेक्षा अमूर्ताकडे, व्यक्तपेक्षा अव्यक्ताकडे जाणाऱ्या ओढीचा होता. त्यांची साहित्यिक दृष्टी कशाचा तरी वेध घेताना दिसते. क्रांतीचा जयजयकार करून विशाखा या त्यांच्या काव्यसंग्रहामुळे ते प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यावेळच्या पोषक साहित्यविषयक वातावरणामुळे ते झपाटले गेले. समाजाची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या

 Vishnu Vaman Shirwadkar
मराठी साहित्य सांस्‍कृतिक संमेलन पार पडले उत्साहात

एकूणच साहित्यातून विशेषतः कवितांतून अभिव्यक्त केली.

आपल्या भाषणात गो. रा. ढवळीकर म्हणाले की, आपल्या देशातील दहाव्या क्रमांकाची समृद्ध मराठी भाषा आहे. सुमारे 2500 वर्षाचा प्रदीर्घ इतिहास या भाषेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त व्हायला हवा,त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मातृभाषा झिडकारली, तर कोणतीच प्रगती होणार नाही.

प्रा. डॉ. जोशी यांच्या हस्ते पारंपरिक दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. डॉ. अनिता तिळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. हेमंत खांडेपारकर, डॉ. नूतन देव, माधुरी शेणवी उसगावकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ अर्पून स्वागत केले. दुर्गाकुमार नावती यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला के. डी. मनवाडकर, एम. के. पाटील, नरहरी नाईक यांच्याबरोबरच बरेच रसिक श्रोते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com