General Meeting of Sattari Taluka Farmers Society Dainik Gomantak
गोवा

Sattari News: ...आणि सभा तापली! सत्तरी शेतकरी सोसायटी आमसभेत आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ

गोमन्तक डिजिटल टीम

Sattari Taluka Farmers Society Meeting

वाळपई: सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोपांमुळे गाजली. तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक पदाच्या विषयावरून काहीवेळा गोंधळ निर्माण झाला.

सुरवातीलाच सभासद कांता गावकर यांनी भलताच विषय उपस्थित केल्यामुळे सभा रेंगाळली. त्यानंतर मागील सभेत मांडलेल्या ठरावांवर कोणती कारवाई केली तसेच प्रगती पुस्तकावरील काही मुद्यांवर काही सभासदांनी प्रश्‍न उपस्थित केले. अध्यक्ष अनिल काटकर यांनी यावेळी शंकाचे निवारण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी उपाध्यक्ष सगुण वाडकर, ॲड. गणपत गावकर, संचालक पांडुरंग गावस, प्रदीप गवडळकर, नारायण गावकर, सुरंगा नाईक, शहाजी देसाई, सीताराम देसाई, कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, जमिला शेख, चार्टर अकाउंटंट शिवानंद पळ आदींची उपस्थिती होती.

सभासद म्हाळू गावस यांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित केला. जे कर्मचारी संस्थेत चांगली कामगिरी करतात त्यांना पगार वाढ देण्याची सूचना केली.

हरिचंद्र गावस यांनी बॅक शाखेत वीज व पाण्याची बिले दोनच दिवस स्वीकारली जातात, त्यामुळे सामान्य नागिरकांना याचा त्रास होतो आहे, असे सांगितले. यावर चर्चा होऊन पूर्ण आठवड्यात बिले स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

नामदेव केरकर यांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याची सूचना केली त्यावर सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू असल्याचे सांगण्यात आले. तसेच जे कर्मचारी ड्रेस कोडचा नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.

संस्थेचा केरी व इतर शाखेत लवकरच डिजिटलायझेशन होणार आहे. वाळपईतील संस्थेचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे काम खूप सोपे झाले असे काटकर यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना अनुदानावर सर्व प्रकारचे खत

काटकर यांनी यांनी यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही संस्था कार्य करीत असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत उपलब्ध केले. पुढील काळात शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारचे खत अनुदानावर उपलब्ध करण्यात येईल, असे अध्यक्ष अनिल काटकर यांनी सांगितले.

...आणि सभा तापली

सभासद कांता गावकर यांनी वार्षिक अहवालावर अध्यक्षांची एकट्याची सही का?, तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक पद रिक्त आहे की भरलेले आहे, यावर स्पष्टीकरण मागितल्यावर सभेत गोंधळच उडाला. अध्यक्ष अनिल काटकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना यापुढे अशा चुका होणार नाही याची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

सभासदांचा सूचना

धनंजय देसाई यांनी संस्थेच्या खरेदी विक्री केंद्रात चांगल्या दर्जाचा तांदूळ व इतर साहित्य उपलब्ध करण्यासाठी संस्थेचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कांता गावकर यांनी सभासद यादीतून मयत सदस्यांची नावे वगळण्याचे आवाहन केले.

संस्थेच्या केरी व होंडा या ठिकाणी असलेल्या मालमत्ता वाचविण्यात संचालक मंडळ अपयशी ठरलेले आहे. या संदर्भात प्रश्न संस्थेचे सभासद विष्णू पारोडकर, भीमराव राणे व नामदेव गावस यांनी उपस्थित केला केला. यावर तीन महिन्यात तोडगा काढण्याचे आश्‍वासन काटकर यांनी दिले.

सभासद राम चोर्लेकर व पांडुरंग सावंत यांनी कर्ज मर्यादा पाच लाखांवरून दहा लाख करणे, हिशेब तपासणीसाठी योग्य ऑडिटर नेमणे आदी विषय संचालकांच्या लक्षात आणून दिले. पांडुरंग सावंत यांनी शंकाचे निवारण केले.

यावेळी कृषी अधिकारी विश्‍वनाथ गावस यांचा सत्कार करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Smart City: प्रशासन 'पुन्हा' अपघात होण्याची वाट पाहत आहे काय? 'सांतिनेज-पणजी' येथे पुन्हा झाडांकडे अक्षम्य दुर्लक्ष

Goa Art: कॉमर्समधून पदवी घेतलेल्या आशिषचा चित्रकारापर्यंतचा प्रवास, कला क्षेत्रात आर्थिक स्थैर्य असते का?

Bicholim Accident: काळ आला होता पण..! वाठादेव बगलमार्गावर पुन्हा अपघात; पायलट थोडक्यात बचावला

Bhutani Infra: ..तर 'वायनाड'ची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही! सांकवाळ येथे रॅलीतून 'भूतानी' विरोधात इशारा

Leopard In Goa: रात्रीच्या वेळी बिबट्याचा संचाराने लोकांच्यात दहशत! कोरगावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT