Goa Assembly Elections: Goa Congress
Goa Assembly Elections: Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: काँग्रेसची उमेदवारी तब्बल 30 लाखांना

दैनिक गोमन्तक

मडगाव: तृणमूल काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात आलेले तियात्रिस्त टोनी डायस यांना काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तेथील काँग्रेस कार्यकर्ते संतप्‍त बनले आहेत. ही उमेदवारी 30 लाखांना विकली गेली, असा आरोप काँग्रेसच्‍या (Goa Congress) दक्षिण गोवा जिल्हा कार्यकरिणी सरचिटणीस जीना परेरा यांनी चक्क दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला. (Allegation of Selling Congress Candidature For Goa Assembly Elections)

आम्हाला गप्प बसा असे सांगण्यात येते. पण आमच्यावर अन्याय झाला असताना आम्ही गप्प कसे बसू, असा सवाल परेरा यांनी उपस्‍थित केला. बाणावलीची उमेदवारी 30 लाख रुपयांना विकली गेली असा जो आरोप होतोय, तो खराच असावा असे आता वाटू लागले आहे असे त्या म्हणाल्या. पक्षाचे उमेदवार टोनी यांच्यासाठी आम्ही काम करणार नाही हे स्पष्ट करत आता काय करायचे ते मतदारांनीच ठरवायचे असेही त्या म्हणाल्या.

गोवा फॉरवर्डपासून (Goa Forward) सर्व पक्षांकडे चाचपणी करून शेवटी टोनी तृणमूल काँग्रेस पक्षात सामील झाले होते. ज्या दिवशी त्यांना तूणमूलमधून काँग्रेस (TMC) पक्षात घेतले जाते, त्या दिवशी सकाळपर्यंत ते तृणमूलचा प्रचार करीत होते. सायंकाळी त्यांना काँग्रेस पक्षात घेतले जाते आणि 48 तास उलटण्यापूर्वीच उमेदवारी दिली जाते. हे सगळे कोणाच्‍या सांगण्‍यावरून केले गेले? अशा उमेदवाराला मतदान करा असे आवाहन आम्ही लोकांना कोणत्या तोंडाने करायचे, असे सवाल परेरा यांनी उपस्‍थित केले.

सगळाच अनागोंदी कारभार

काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळावे यासाठीच आपण इंग्रजीमध्ये ही पत्रकार परिषद घेतेय. उमेदवार गट समिती ठरविणार असे आम्हाला पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी सांगितले होते. आमच्या गटाने पाच नावे दिली होती. त्यात टोनी डायस यांचे नाव नव्हते. तरीही त्यांना उमेदवारी कशी मिळाली? चिदंबरम आमच्याशी खोटे बोलले का? फक्त बाणावलीतच नव्हे तर शिरोड्यातही तीन दिवसांपूर्वी पक्षात घेतलेल्या तुळशीदास बोरकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. कळंगुटमध्ये गट समितीला काळोखात ठेवून मायकल लोबो आणि त्यांच्या पत्नीला शिवोलीची उमेदवारी दिली. मांद्रे गोवा फॉरवर्डला सोडताना काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. हा सर्व अनागोंदी कारभार असल्‍याचे परेरा म्हणाल्या. पक्षाच्‍या अशा कारभारामुळेच कार्यकर्ते नाराज बनले आहेत. तर अनेकजण पक्षापासून दुरावले आहेत. पक्षश्रेष्‍ठींनी दखल घेतली नाही तर निवडणूक कठीण जाणार असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.

प्रक्रिया पुन्हा सुरू करा : रॉयला

बाणावलीच्या काँग्रेस उमेदवारीच्या दावेदार असलेल्या रॉयला फर्नांडिस यांनी आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्याऐवजी सर्व प्रक्रियाच पुन्हा सुरू करा अशी मागणी वेगळी पत्रकार परिषद घेऊन केली. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी एवढे मोठे अधिवेशन घेतले, मात्र महिलांना उमेदवारी का दिली नाही? गोव्यात महिला उमेदवार म्हणून काँग्रेसला भाजपमधून आयात केलेली महिलाच सापडली का, असे परखड सवाल त्यांनी उपस्‍थित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT