वाळपई शासकीय आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाईल. येत्या महिन्याभरात याची सुरवात होईल. खासगी इस्पितळांशी सहकार्य करार करून तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध केले जातील. जेणे करून लोकांचा पैसा व वेळ देखील वाचेल. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा पुरवण्याचा आपला प्रयत्न आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०४ वा मन की बात कार्यक्रमाचे टीव्हीवरील थेट प्रसारण पाहण्यासाठी वाळपईत आयोजित केलेल्या खास कार्यक्रमावेळी राणे बोलत होते. यावेळी वाळपईच्या नगराध्यक्ष शैहजीन शेख, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य रामनाथ गावडे, विनोद शिंदे तसेच विविध पंचायतीचे बूथ सदस्य व नागरिक उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले की, मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक एकत्र येत आहेत. या कार्यक्रमातून देशभरातील विविध उपक्रमाची माहिती मिळते.
राणे पुढे म्हणाले की, रस्त्यांचे जाळे विणून सरकारने ग्रामीण भाग जोडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला गती आली आहे, असे ते म्हणाले. भारताने नुकतीच चंद्रायान ३ ची मोहीम यशस्वी करून देशाचे नाव मोठे केले आहे.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व इतरांनी पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे टीव्हीवर दाखवण्यात येणारे प्रसारण एकत्र बसून पाहिले.
सत्तरीचा विचार प्रथम...
राज्याचा विकास करताना वाळपई व पर्ये मतदारसंघाचा विचार आपण प्राधान्य क्रमाने करतो. पणजी किंवा इतर शहरात ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व सुविधा वाळपई भागात आणण्याचा आपला प्रयत्न आहे. तसेच शहरी भागात जे नाही ते वाळपईत उपलब्ध करण्याकडे आपण भर राहील, असे राणे म्हणाले.
गरीब श्रीमंत भेद नाही
आपल्या स्वतःचा घरात जेव्हा कोणाला काही आजार झाला की त्यावेळी आपल्यावर कोणता प्रसंग येतो याचा स्वतः अनुभव आपण घेतला आहे. सत्तरीत गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. आरोग्य सेवा सुधारताना प्रत्येकाला एकसारखीच सेवा देण्यात येत आहे. १०८ आरोग्य सेवेचा ग्रामीण भागाबरोबर शहरी भागात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. या सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत आहेत, असे राणे म्हणाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.