‘पाडेली’ मिळेनात, अन्‌ नारळ पडेनात!

गेल्या काही वर्षांत नारळ पाडण्यासाठी फोंडा तालुक्यात पाडेली सहज उपलब्ध होत नसल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्‍या आहेत.
Coconut Tree
Coconut TreeDainik Gomantak
Published on
Updated on

‘नि सर्गाची करणी आणि नारळात पाणी’ असे म्‍हटले जाते. अशा या नारळाशिवाय गोव्‍यातील प्रत्येक घरात स्वयंपाक तयारच होत नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे उंच आकाशाकडे झेप घेत आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत नारळ पाडण्यासाठी फोंडा तालुक्यात पाडेली सहज उपलब्ध होत नसल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्‍या आहेत.

Coconut Tree
Goa Suicide Case: ‘रुअ द ओरेम’ खाडीत महिलेची आत्महत्या

लुप्त होत चाललेला हा पारंपरिक व्यवसाय परप्रांतीयांच्या घशात गेल्याने त्याचे अधिक दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे पाडेलींसाठी तयार केलेल्या सरकारच्या योजनांचा लाभ राज्यातील कमी शिक्षण घेतलेल्या युवकांनी घेतल्यास त्याचा निश्‍चितच चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.

नारळ पाडण्यासाठी पाडेली मिळणे खूप कठीण बनले आहे. त्‍यांना शोधण्याची वेळ कुळागरे सांभाळणाऱ्यावर आली आहे.

Coconut Tree
Goa Accident Case: मयेत व्हॅनची झाडाला धडक चालक गंभीर, गोमेकॉत दाखल

त्यात अलीकडेच नारळाचे दर घसरल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतोय. वेळेवर पाडेली मिळत नसल्याने बागायतदारांना नारळ पाडण्यासाठी परप्रांतीय कामगार आणावे लागतात.

काही वर्षांपूर्वी फलोत्पादन केंद्रावरून बागायतदारांना पाडेली पुरविण्‍याची सोय केली होती. परंतु ते युवक संध्याकाळच्या वेळी स्वतः कंत्राट घेऊन नारळ पाडण्यासाठी जात असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com