Madgaon Urban Bank Dainik Gomantak
गोवा

मडगाव अर्बनच्या सर्व शाखा 1 एप्रिलपासून बंद होणार

रिझर्व्ह बँकेकडून परवाना रद्द झाल्यानंतर बँकेकडून प्रसिद्धीपत्रक जारी

आदित्य जोशी

मडगाव : मडगाव अर्बन बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मडगाव अर्बनच्या सर्व 9 शाखा 1 एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज यासंबंधीचं प्रसिद्धीपत्रक बँकेकडून जारी करण्यात आलं आहे. (Madgaon Urban Bank News Updates)

मडगाव (Madgaon) अर्बन बँकेच्या गोवा राज्यभरात एकूण 9 शाखा आहेत. 27 जुलै 2021 रोजी मडगाव अर्बनचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रद्द करण्यात आला होता. त्यामुळे बँकेच्या सर्वच खातेधारकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. यानंतर रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनंतर सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारकडून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. आता या बँकेच्या सर्व शाखाही बंद केल्या जाणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने (RBI) परवाना रद्द केल्यानंतर एस व्ही नाईक यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. आर्थिक अनियमिततेच्या ठपक्यानंतर बँकेचं कामकाज प्रशासकामार्फत सुरु होतं. यानंतर खातेदारांचे पैसेही देण्यात येणार होते. आता 1 एप्रिलपासून गोव्यात असलेल्या मडगाव, सांगे, मडगाव जुने मार्केट, कुडतरी, बाणावली, पणजी (Panjim), सांत आंद्रे, आके आणि फोंडा या सर्व शाखा बंद केल्या जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT