Stray Cattle Dainik Gomantak
गोवा

Stray Cattles: भटक्या गुरांच्या समस्येबाबत हळदोणा पंचायत Action Modeवर; मालकांवर होणार कारवाई

Aldona Stray Cattles: हळदोणा पंचायत मंडळाने भटक्या गुरांची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने संबंधित मालकांवर कठोर कारवाई आणि दंड लागू करण्याचा निर्ण़य घेतला आहे.

Sameer Panditrao

Aldona Stray Cattles Rules Action

म्हापसा: हळदोणा पंचायत मंडळाने भटक्या गुरांची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने संबंधित मालकांवर कठोर कारवाई आणि दंड लागू करण्याचा निर्ण़य घेतला आहे.

सरपंच आश्विन डिसोझा यांनी सांगितले की, भटक्या गुरांच्या मालकांना संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार दंड ठोठावला जाईल. तसेच तरीही आपली गुरे सार्वजनिक ठिकाणी सोडणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यासह गुरे जप्त केली जाईल.

खोर्जुवे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भटकी गुरे शिरत असल्याच्या समस्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. याशिवाय भुटक्या गुरांमुळे जनतेला त्रास होत आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण राखण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा करीत आहोत, असे डिसोझा यांनी सांगितले.

पंचायत क्षेत्रात अलीकडे भटक्या गुरांची समस्या वाढली आहे. परिणामी रहिवासी, प्रवासी, शेतकरी आणि इतरांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच रस्ता, लागवडीखालील शेत आणि सार्वजनिक ठिकाणी भटक्या गुरांच्या उपद्रवामुळे सार्वजनिक सुरक्षा, वाहन वाहतूक तसेच स्वच्छतेला धोका निर्माण झाला आहे.

पंचायत मंडळाच्या पाक्षिक बैठकीत या समस्याचे निराकरण करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर ठराव घेण्यात आला. भटकी गुरे ओळखणे व त्यांचे सरकारमान्य निवारा केंद्रात स्थलांतरण करणे सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या

तसेच ओळख दाखवणारे निशान नसलेल्या गुरांच्या मालकाकडून कायद्यानुसार दंड आकारण्यात येईल, असे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT